एक्स्प्लोर
,Reheating Food: 'या' गोष्टी पुन्हा गरम करुन कधीही खाऊ नका
,Reheating Food: असे काही पदार्थ आहेत ज्यांना पुन्हा गरम करुन खाल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. कोणते आहेत हे पदार्थ सविस्तर जाणून घेऊया.
Reheating Food( Image Source : Freepik )
1/8

बटाटा: बटाट्यापासून बनवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बटाटा पुन्हा गरम केल्याने त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम बॅक्टेरिया विकसित होऊ लागतात, ज्यामुळे बोट्युलिझम रोग होऊ शकतो.
2/8

हा रोग पाठीचा कणा, मज्जातंतू आणि मेंदूवर हल्ला करतो आणि पक्षाघात होऊ शकतो. बटाट्यामध्ये दूध, मलई, लोणी यांसारख्या नाशवंत अन्नपदार्थ मिसळल्यास आजारी पडण्याचा शक्यता असते.
3/8

पालक: जर पालक योग्य प्रकारे गरम केले नाही तर ते लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स बॅक्टेरियामुळे होणारा लिस्टेरिओसिस रोग होऊ शकतो.
4/8

लिस्टेरिओसिस हा एक संसर्ग आहे ज्यामुळे मान ताठ, ताप, डोकेदुखी आणि कधी कधी चक्कर येऊ शकतात. हा जीवाणू अन्नपदार्थांमध्ये असतो.
5/8

भात: लोक बरेचदा उरलेला भात गरम करून खातात. बटाटे आणि पालक याच्याप्रमाणे भात पुन्हा गरम करणे देखील टाळले पाहिजे.
6/8

कारण भातामध्ये छिद्र असतात, जे उष्णतेला प्रतिरोधक असतात आणि रोगजनकांच्या वाढीस कारणीभूत असतात.
7/8

अंडी:अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतो, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या, ताप आणि अतिसार होऊ शकतो.
8/8

जेव्हा अंडी योग्य तापमानात साठवली जात नाहीत, तेव्हा रोगजंतूंची झपाट्याने वाढ होते. या जीवाणूमुळे विषबाधा होऊ शकते.
Published at : 05 May 2023 06:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
