एक्स्प्लोर
'हे' मराठी कलाकार आपल्या नावापुढे आडनाव नाही तर 'हे' नाव लावतात..
आपल्या नावामुळे नाही तर कामामुळे कलाकार नावारुपाला येतात. पण कलाक्षेत्रात काही कलाकार आपलं आडनाव लावत नाहीत. नक्की कोणते आहेत हे कलाकार जाणून घेऊया.

Marathi actor
1/9

चिन्मयी सुमित - फास्ट फेणे, मुरांबा यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केलेली अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमित. चिन्मयीचं पूर्ण नाव चिन्मयी सुमित राघवन असं आहे.
2/9

अमृता सुभाष - किल्ला, अजिंठा यांसारख्या चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. पण अमृताचं पूर्ण नाव अमृता सुभाष कुलकर्णी असं आहे.
3/9

सायली संजीव - मराठी मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.पण सायली अभिनय क्षेत्रात तिच्या नावापुढे आडनाव नाही तर फक्त तिच्या वडिलांचं नाव लावते. सायलीचं पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर असं आहे. पण सायलीची अभिनय क्षेत्रातील ओळख सायली संजीव या नावाने आहे.
4/9

राधा सागर - आई कुठे काय करते या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री फक्त तिच्या नवऱ्याचं नाव लावते. राधाचं पूर्ण नाव राधा सागर कुलकर्णी असं आहे.
5/9

रसिका सुनील - रसिका ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रातील तिची ओळख ही रसिका सुनील या नावाने आहे. पण तीचं पूर्ण नाव रसिका सुनील धबडगांवकर असं आहे.
6/9

ललित प्रभाकर - मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणजे ललित प्रभाकर. ललितची देखील चित्रपटसृष्टीतील ओळख ललित प्रभाकर या नावाने आहे. ललितचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे.ललित फक्त त्याच्या वडिलांचं नाव लावतो.
7/9

दिव्या सुभाष - मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या सुभाष. दिव्याचं पूर्ण नाव दिव्या सुभाष पुरगांवकर असं आहे.
8/9

पृथ्वीक प्रताप - महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप हा देखील आपल्या नावापुढे आडनाव लावत नाही. पृथ्वीकचे पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे.
9/9

तेजस्वी प्रकाश - बिग बॉस सीजन 15 मधून प्रकाशझोतात आलेली तेजश्री फक्त तिच्या वडीलांच नाव लावते. तेजश्रीचं पूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे.
Published at : 28 Apr 2023 05:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
