एक्स्प्लोर
Advertisement

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री, पण खरं आयुष्य अत्यंत वेदनादायी, मृत्यूनंतर बंगल्यातच कुजत राहिला मृतदेह
आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिला एकेकाळी हिंदी चित्रपटांची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं. इंडस्ट्रीमधल्या इतर नट्या म्हणजे, तिच्यासमोर अगदी पाणी कम चाय म्हणा ना...

Bollywood Nalini Jaywant
1/12

पण काही काळ अधिराज्य गाजवल्यानंतर मात्र तिनं इंडस्ट्रीतून एग्झिट घेतली. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र तिला फारच कष्ट सोसावं लागलं. उतारवयात इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री असूनही तिच्या नशीबी एकट्यानं जगायचे भोग आले.
2/12

अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट म्हणजे, तिच्या मृत्यूची दखल कुणी घेतली नाही, कित्येक दिवस तिच्या बंगल्यात तिचा मृतदेह तसात पडून होता.
3/12

आपण ज्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती दुसरी कोणी नसून नलिनी जयवंत आहे. नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 रोजी झाला. 1940 आणि 1950 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
4/12

1950 च्या दशकात, फिल्मफेअरनं त्यांना हिंदी चित्रपटांमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून संबोधलं. अभिनेते दिलीप कुमार यांनी नलिनीचं कौतुक केलेलं आणि सांगितलेलं की, त्यांनी ज्या-ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं, त्यांपैकी सर्व अभिनेत्रींमध्ये नलिनी सर्वोत्कृष्ट होती.
5/12

नलिनी जयवंत यांनी सिस्टर्स (1941) आणि अनोखा प्यार (1948) यांसारख्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दिलीप कुमार, देवानंद यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत नलिनी यांनी स्क्रिन शेअर केली. समाधी (1950), संग्राम (1950), राही (1955) यांसारख्या चित्रपटांमधून नलिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
6/12

प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी असूनही नलिनी जयवंत यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूपच वेदनादायी होतं.
7/12

नलिनी यांनी पहिलं लग्न चित्रपट निर्माता वीरेंद्र देसाई यांच्याशी केलं होतं, पण त्यांचं लग्न काही फार काळ टिकलं नाही.
8/12

इंडस्ट्रीत नवनवीन अभिनेत्रींच्या एंट्रीमुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांना ऑफर केल्या जाणाऱ्या भूमिका कमी झाल्या आणि त्या हळूहळू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर गेल्या.
9/12

नलिनी जयवंत यांनी उतारवयात स्वत:ला घरात बंदिस्त केलं होतं आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं होतं. या अभिनेत्रीलाही लोक विसरले. चेंबूरच्या युनियन पार्कमधील त्यांच्या आलिशान बंगल्यात नेहमीच रेलचेल असायची. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांत मात्र, त्यांच्या आयुष्याला एकाकीपणानं ग्रासलं.
10/12

22 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथील बंगल्यावर निधन झालं. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात तसाच पडून होता. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत, आसपासच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल काहीच कळालं नाही.
11/12

त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं होतं की, 2001 मध्ये पती प्रभू दयाल यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला समाजापासून वेगळं केलं होतं. अनेकजण त्यांना भेटायला यायचे, पण त्या टाळायच्या. लोकांना भेटणं त्यांनी बंद केलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनीही त्याची काळजी घेतली नाही.
12/12

नलिनीचा मृत्यू कसा झाला आणि तिचा अंत्यसंस्कार कोणी केला, हे अजूनही गूढ आहे.
Published at : 29 Aug 2024 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
