एक्स्प्लोर
उफ तेरी अदा... 'पंचायत' फेम रिंकी रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस; वेस्टर्न लूकमधील फोटो पाहून व्हाल घायाळ
Panchayat Fame Rinky : 'पंचायत' वेब सीरिज फेम रिंकी म्हणजेच सान्विका हिचा आज 8 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. (PC : instagram/sanvikaa)
Panchayat Fame Rinky
1/11

'पंचायत' सीरीजमधील प्रधानजींची मुलगी 'रिंकी'चा ऑनस्क्रीन साधा भोळा लूक प्रेक्षकांच्या खूपच मनात भरला. मात्र, 'पंचायत'मध्ये साधी भोळी दिसणारी साविका खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
2/11

सान्विका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 490 हजार फॉलोअर्स आहेत. दररोज अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटोंद्वारे सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
3/11

सान्विका ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. त्यांनी इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे.
4/11

सान्विकाला कधीच नोकरी करायची इच्छा नव्हती. सुरुवातीपासूनच तिचा अभिनयाकडे जास्त कल होता.
5/11

एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला होता की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी ती कुटुंबियांशी खोटे बोलून मुंबईत आली होती.
6/11

घरच्यांशी खोटं बोलून सान्विका मुंबईत पोहोचली, पण इथे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
7/11

तिने हार मानली नाही, खूप मेहनत घेऊन तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मिळवला. यानंतर तिला टीव्ही इंडस्ट्री आणि जाहिरातींमध्ये काम मिळू लागले.
8/11

टीव्ही-जाहिरातींसोबतच, तिने 'हजमत' आणि 'लखन लीला भार्गव' सारख्या वेब सीरिजमध्येही काम केलं.
9/11

अनेक जाहिराती आणि वेब सीरिज केलेल्या सान्विकाला खरी ओळख TVF ची लोकप्रिय वेब सीरीज 'पंचायत' मधून मिळाली.
10/11

पंचायत सीरीजमध्ये तिने प्रधानजींच्या मुली भूमिका साकारली होती. 'रिंकी'च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
11/11

अभिनय कौशल्याच्या बळावर तिने वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
Published at : 08 Jan 2025 09:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























