Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ अनिल देशमुख यांनी शेअर केला असून या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा करुया कोरा, असे आश्वासन फडणवीस देताना दिसून येत आहेत.
Anil Deshmukh : लाडकी बहीण योजनेसाठी करावे लागणाऱ्या तरतुदींमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला असतानाच आता शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनाची सुद्धा विरोधी पक्षांकडून आठवण करून देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपले महाराष्ट्र विधानसभा प्रचारातील एक व्हिडिओ समोर आणताना त्यांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देत शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करण्याची मागणी केली आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटला आहे की, जर आपण आश्वासन पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई लढण्याची आमची तयारी असल्याची तयारी आहे. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार सभेतील व्हिडिओ शेअर करताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी केली आहे.
माननीय अजितदादा...
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 12, 2025
आपण जरी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा उल्लेख निवडणूक काळात केला नसेल परंतु आपलाच मित्र पक्ष भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात प्रचार सभेत जाहीरपणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते.… pic.twitter.com/gJu9h69ONX
त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की माननीय अजितदादा... आपण जरी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा उल्लेख निवडणूक काळात केला नसेल परंतु आपलाच मित्र पक्ष भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक काळात प्रचार सभेत जाहीरपणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. आता सरकार म्हणून आपली सुद्धा ही जबाबदारी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस जी आमची मागणी आहे की निवडणूक काळात आपण जाहीरपणे शेतकऱ्याची कर्जमाफी करू असे बोलत होते ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे. देवेंद्र फडणवीसजी आपण मुख्यमंत्री असल्यामुळे स्वतः कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकता. आपण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळात रस्त्यावरची लढाई लढण्याची आमची तयारी आहे!
शेतकऱ्यांचा सात बारा करुया कोरा
देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ अनिल देशमुख यांनी शेअर केला असून या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा करुया कोरा, असे आश्वासन फडणवीस देताना दिसून येत आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणारं आहे. पुन्हा सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण कर्जमाफी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या सात बारा करुया कोरा, कोरा असे म्हणताना दिसून येत आहेत.