एक्स्प्लोर

आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!

भारताशी मजबूत राजनैतिक संबंध असलेल्या देशांच्या नेत्यांनाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताने प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो (President Prabowo Subianto) यांना आमंत्रित केले आहे. मात्र, भारताकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारताकडून इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा आखला जात असतानाच प्रबोवो सुबियांतो यांचा दिल्लीतून पाकिस्तान (Pakistan) दौऱ्याचे सुद्धा नियोजन सुरु होते. मात्र, भारताच्या प्रखर विरोधनंतर त्यांनी पाकिस्तान दौरा रद्द केल्याची चर्चा आहे. भारताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना पाकिस्तानला भेट न देण्याचे पटवून दिले आहे. 'द प्रिंट'ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष सुबियांतो भारत भेटीनंतर पाकिस्तानला भेट देणार नाहीत. 

पाकिस्तानी मीडियात इंडोनेशिया राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची चर्चा 

या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सने दावा केला होता की सुबियांतो तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. ते भारताचा दौरा करणार असून तेथून पाकिस्तानला रवाना होणार आहेत. मात्र, भारत सरकारला सुबियांटो भारतातून थेट पाकिस्तानात जायला नको होते. यासाठी भारताने इंडोनेशियासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.

भारताने विरोध का केला? 

इंडोनेशिया हा आशियाई प्रदेशातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अलिकडच्या वर्षांत भारताने दक्षिण इंडोनेशियासोबतच्या संबंधांवर अधिक लक्ष दिले आहे. या मजबूत संबंधांमध्ये सुबियांटोच्या पाकिस्तान भेटीचा भारतासोबतच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ नये, असे भारताला वाटत होते. जर सुबियांतो प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर लगेचच इस्लामाबादला गेले तर भारतासाठी नकारात्मक संकेत असू शकतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून तणावपूर्ण संबंध आहेत आणि एका प्रमुख परदेशी नेत्याने भारताच्या भेटीनंतर लगेचच पाकिस्तानला भेट दिल्याने भारताची द्विपक्षीय स्थिती कमकुवत होऊ शकते.

भारताने अद्याप प्रमुख पाहुण्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही

दुसरीकडे, भारताशी मजबूत राजनैतिक संबंध असलेल्या देशांच्या नेत्यांनाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. तथापि, पूर्वी अशी परंपरा होती की भारत प्रजासत्ताक दिनाचा भाग असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या नावाची घोषणा काही महिने अगोदर करत असे. मात्र यावेळी भारताने प्रजासत्ताक दिनाच्या15 दिवस राहिले, तरी प्रमुख पाहुण्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. सुबियांतो यांचा पाकिस्तान दौराही यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. 2018 मध्ये, इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती जोको विडोडो यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाग घेतला होता. मात्र, भारत भेटीनंतर ते दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर पाकिस्तानला गेले. मात्र यावेळी भारत सरकारने अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घेतली आहे. 

पाकिस्तानने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीची घोषणा केली

या महिन्याच्या अखेरीस इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीची घोषणाही पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते 26 जानेवारीला इस्लामाबादला येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी इंडोनेशिया आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. गुरुवारी त्यांची बैठकही झाली. पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी त्याचे अध्यक्षपद भूषवले.

भारत दौऱ्यानंतर सौदीचे क्राऊन प्रिन्स पाकिस्तानला गेले नाहीत

जेव्हा सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सप्टेंबर 2023 मध्ये G-20 शिखर परिषदेनंतर एक दिवसीय दौऱ्यावर आले होते. या भेटीपूर्वी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रिन्स सलमान यांना काही तासांसाठी का होईना भारतातून पाकिस्तानात यावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र, भारतामुळे त्यांची डाळ शिजली नाही. प्रिन्स सलमान फेब्रुवारी 2019 मध्ये भारतात आले होते, तेव्हा मात्र, भारतातून परतताना त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Embed widget