एक्स्प्लोर

Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार

Anil Deshmukh : वाल्मिक कराडला वगळून सर्वांवर मोक्काची कारवाई करण्यात आल्यानं त्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार पाठीशी घालतंय का? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केलाय.

Anil Deshmukh on Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Case) वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच मुख्य आरोपी असल्याचं आणि सर्वात जास्त आरोप असल्याचं सध्या चित्र समोर येत आहे. वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्यानं त्याच्यावर 302 चा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, मुख्य आरोपी कराड असल्याचं पोलीस तपासात समोर येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कराडला वगळून सर्वांवर मोक्काची कारवाई करण्यात आल्यानं त्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार (BJP Government) पाठीशी घालतंय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केलाय. तसेच शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी संघाची स्तुती केली म्हणजे, एखाद्याचं मोठं मनं करून तारीफ केली म्हणजे पवार साहेबांची ताकद कमी झाली नाही, त्यामुळं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं स्टेटमेंट बालिशपणाचं असल्याची टीका त्यांनी केली आहे.  

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर अनिल देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांची ज्या अमानुष पद्धतीनं हत्या झाली आहे, त्याचा आक्रोश मराठवाड्यात आहे. यातील सर्व दोषींवर कडक करावी झाली पाहिजे. याच्या मागं वाल्मिक कराडचं आहे, अशी सर्वांची भावना आहे. वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचं आणि सर्वात जास्त आरोप असल्याचे सध्या चित्र समोर येत आहे. वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाइंड असल्याने त्याच्यावर 302 चा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. मुख्य आरोपी कराड असल्याचे पोलीस तपासात समोर येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कराडला वगळून सर्वांवर मोक्काची कारवाई करण्यात आल्यानं त्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार पाठीशी घालतंय का? अशी भावना मराठवाड्यातील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. याचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस अतिशय बालिश स्टेटमेंट करतात

शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या यशाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक केलं होतं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे चाणक्य आहेत. त्यांना लक्षात आलं असेल की, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सेट केलेलं फेक नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत कसं पंक्चर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकारण करणारी नाही, तर राष्ट्र निर्माण करणारी शक्ती आहे, हे शरद पवार यांना समजलं असेल. आपल्या स्पर्धकाच सुद्धा कौतुक करावे लागते. म्हणून त्यांनी RSS च कौतुक केले असावे, असे त्यांनी म्हटले. यावर अनिल देशमुख म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस हे अतिशय बालिश स्टेटमेंट करतात. एखाद्या पक्षाचं किंवा संघटनेच्या चांगल्या गोष्टी असल्या तर, शरद पवार साहेबांनी मोठं मनं करून सांगितलं. याचा अर्थ असा नाही, की पवार साहेबांची ताकद महाराष्ट्रात, देशात कमी झाली असेल, असा पलटवार त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. 

ईव्हीएमच्या मदतीनं सध्याचं सरकार 

ते पुढे म्हणाले की,  2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींची 10 वर्षांपूर्वी हवा होती. तेव्हा 288 जागा लढविल्या आणि आल्या 122 जागा. 2024 मध्ये मोदींची कुठेही हवा नाही, सर्वत्र रोष असताना भाजप 149 जागा लढतात आणि 132 जागा जिंकतात. मोदींची हवा असताना 42 टक्के जागा निवडून आल्या आणि आता हवा नसताना 89 टक्के जागा निवडून आल्यात. त्यामुळं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात निकाल लागलेत, कुठेही उत्साह नाही. नागपूर-मुंबईला जात असताना काही भाजपच्या आमदारांनी सुद्धा या निकालावर आश्चर्य व्यक्त केलं. लाडकी बहीण आणि ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. ईव्हीएमच्या मदतीनं सध्याचं सरकार हे राज्यात आलेलं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे . 

तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना ठाकरे गट महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. यावर अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. लोकसभा, विधानसभा या मोठ्या निवडणुकांसाठी आम्ही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं भूमिका घेवू शकतो. त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेकदा वेगळ्याच लढलेल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून सर्व मोठ्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्र राहू. जेव्हा स्थानिक संस्थेच्या निवडणुका लागतील तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंना कुठं ठेवायचं हे देवेंद्र फडणवीसांनी ओळखावं, रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Embed widget