एक्स्प्लोर
Bollywood Actress: सीन शूट करताना तब्बल 5 मिनिटं सुपरस्टारनं अभिनेत्रीला केलं Kiss; रड रड रडली होती 'ही' टॉपची हिरोईन
Bollywood Actress: फिल्म अंजाना सफर (नाव बदलून दो शिकारी ठेवण्यात आलं होतं) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखासोबत एक घटना घडली. सुपरस्टार विश्वजित चॅटर्जी रेखाला जबरदस्तीनं किस करत राहिले.

Bollywood Actor Biography Rekha
1/10

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रयोगशील भूमिका केल्या आहेत. त्यांनी अनेक सुपरस्टार्ससोबतही काम केलं.
2/10

रेखा यांच्या चित्रपटांमधील अभिनयाची दखल घेतली गेली आणि खूप प्रशंसा झाली. मात्र, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा किसिंग सीन शूट करण्यात आला होता.
3/10

रेखा यांच्या अभिनयाची जोड लाभलेल्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक म्हणजे, 'दो शिकारी'. या चित्रपटादरम्यान रेखा केवळ 15 वर्षांच्या होत्या. चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये अभिनेत्याला रेखा यांना किस करायचं होतं. पण, रेखाला याबाबत काहीच माहिती नव्हती.
4/10

रेखा : द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात खुद्द रेखा यांनी बंगाली सुपरस्टार विश्वजित चॅटर्जी यांनी एका चित्रपटाचा सीन शूट करत असताना जबरदस्तीनं त्यांना किस केल्याचं सांगितलं होतं. या घटनेनंतर रेखा यांना धक्काच बसला होता.
5/10

रेखा यांनी सांगितलं होतं की, अभिनेता आणि दिग्दर्शकानं त्यांना किसिंग सीनबाबत सांगितलं नव्हतं. हा सीन तब्बल 5 मिनिटांपर्यंत सुरू होता. शुटिंगदरम्यान दिग्दर्शकानं अभिनेत्याला थांबवलं नाही.
6/10

त्यावेळी बंगाली सुपरस्टार विश्वजित चॅटर्जी 32 वर्षांचे होते. किसिंग सीननंतर रेखा खूपच घाबरल्या होत्या. त्या खूप रडल्या, त्यांना जे घडलं ते अजिबात आवडलं नव्हतं.
7/10

रेखा आणि विश्वजित चॅटर्जी यांचा किसिंग सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
8/10

याबाबत विश्वजित चॅटर्जी यांना विचारलं त्यावेळी, त्यांनी स्वतःचा बचाव केला आणि सांगितलं की, दिग्दर्शकानं जे करायला सांगितलं तेच केलं.
9/10

रेखा त्यांचा फॅशन सेन्स आणि डान्ससाठी देखील ओळखल्या जातात. अलिकडेच रेखा यांनी IIFA मध्ये 22 मिनिटं डान्स परफॉर्मन्स दिला.
10/10

(टीप : 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात त्यांनी सांगितलेला एका किस्सा आहे. त्यावरुन वरील माहिती घेण्यात आली आहे. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Oct 2024 08:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
