कुणाल कामराला दिलेल्या दुसऱ्या समन्सची मुदत संपली, चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानं पोलिस घरी
कुणाल कामराला देण्यात आलेल्या दुसऱ्या समन्सची मुदत आज संपत आहे. तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही. यामुळं आज पोलिस कुणार कामराच्या घरी आले होते.

Kunal Kamara : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बोचरी टाकी केली होती. एका हिंदी गाण्याचे विडंबन करताना त्याने एकनाथ शिंदें याच्याशी साधर्म्य साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टीका केली होती. यावरुन वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आज चौकशीसाठी मुंबई पोलीस कुणाल कामराच्या घरी गेले होते. कुणाल कामराला देण्यात आलेल्या दुसऱ्या समन्सची मुदत आज संपत आहे. तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही. त्यामुळं चौकशीलाठी पोलिस घरी आले होते. मात्र, घरच्यांनी तो घरी नसल्याचं कळवल्यानं पोलीस लगेच आल्या पावली परत गेले आहेत.
चौकशीसाठी कुणाल काम गैरहजर राहिल्याने पोलिस घरी
कॉमेडियन कुणाल कामराने आज खार पोलीस ठाण्यात हजर राहण अपेक्षित होतं. मात्र अद्याप तो चौकशीसाठी हजर झालेले नाही. तत्पूर्वी कामराच्या माहिम येथील निवासस्थानी मुंबई पोलिसांच एक पथक दाखल झालं आहे. पोलिसांच्या वतीने आज जर कामरा हजर झाले नाहीत तर त्यांना कदाचित तिसर समन्स पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या माहिम पोलिसांची एक टीम कामरा यांच्या घरासमोर तैनात करण्यात आली आहे. "तो का आला नाही?" याची चौकशी करण्याकरता पोलीसांचं एक पथक माहिम येथील कामराच्या घरी गेलं होतं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांना दुसरा समन्स पाठवला होता. कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला होता. पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली. याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे) एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामराविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता दुसऱ्या समन्सची देखील मुदत संपली आहे. तरीदेखील कामरा हजर राहिला नाही. शिवसेना नेते मुरजी पटे यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. तक्रारीनुसार, २३ मार्चला एका कार्यक्रमात असताना मला माझ्या मोबाइलवर पक्षातील एका कार्यकर्त्याने पाठवलेली लिंक प्राप्त झाली. त्यात कुणाल कामरा याने कॉन्टीनेन्टल हाँटेल, रोड नं 03, खार पश्चिम, मुंबई या ठिकाणी केलेल्या एका स्टॅण्डअप कॉमेडी शोमधील व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती.
महत्वाच्या बातम्या:
कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही, आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, CM फडणवीसांनाही प्रत्युत्तर
महत्वाच्या बातम्या:
























