एक्स्प्लोर
Ambani Family Qaualification: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील लोक किती शिकले? जाणून घ्या मुकेश अंबानींपासून ते ईशा अंबानींचं शिक्षण
अंबानी कुटुंबीय हे जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहेत. धीरूभाई अंबानी यांनी स्थापन केलेली रिलायन्स इंडस्ट्री आता त्यांची मुलं आणि नातवंडं सांभाळत आहेत. अंबानी कुटुंबीय किती शिकले, माहीत आहे?

Ambani Family Qaualification
1/9

मुकेश अंबानी: देशातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे आहेत. मुकेश अंबानी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
2/9

त्यानंतर मुकेश अंबानी अमेरिकेतील स्कॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBA चं शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र वडील धीरुभाई अंबानी यांना व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांनी MBA चं शिक्षण अर्धवट सोडलं होतं.
3/9

नीता अंबानी: मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी यांनी कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. मुंबईतील नर्सी मोंजी कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.
4/9

आकाश अंबानी: मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी याने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून कॉमर्स फिल्डमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. बिजनेस इकोनॉमिक्सचं शिक्षण त्याने घेतलं आहे.
5/9

अनंत अंबानी: मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंत अंबानी यानेही अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधूनच इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.
6/9

ईशा अंबानी: मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीने अमेरिकेतील येल यूनिव्हर्सिटीमधून सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.
7/9

अनिल अंबानी: अनिल अंबानी यांनी अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामधून MBA ची डिग्री घेतली आहे.
8/9

जयअनमोल अंबानी: अनिल अंबानींचा मोठा मुलगा जयअनमोलने युकेतील Warwick बिजनेस स्कूलमधून B.Sc. केलं आहे.
9/9

जयअंशुल अंबानी: अनिल अंबानींचा लहान मुलगा जयअंशुलने न्यूयॉर्कमधील यूनिव्हर्सिटीमधून बिजनेस मॅनेजमेंट केलं आहे.
Published at : 24 Sep 2023 09:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
करमणूक
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion