Sangli Crime : तासगावमधील हॉस्पिटलमधून अपहरण झालेलं बाळ सुखरुप, महिला पोलिसांच्या ताब्यात
तासगावमधील एका हॉस्पिटलमधून अपहरण झालेलं अवघ्या एक दिवसाचं बाळ सुखरुप मिळाले आहे. इस्लामपूरजवळील भवानीनगर येथे अपहत बाळ मिळाले.पोलिसांनी बाळाचं अपहरण करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतलं आहे.

Sangli Crime : सांगलीतील (Sangali) तासगावमधील एका हॉस्पिटलमधून अपहरण झालेलं अवघ्या एक दिवसाचं बाळ सुखरुप मिळाले आहे. इस्लामपूरजवळील भवानीनगर येथे अपहत बाळ मिळाले.पोलिसांनी बाळाचं अपहरण करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतलं आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून अपहरणाची बाब समोर आली होती. तासगावमधील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये आज (रविवारी) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
बाळाचं अपहरण करणारी महिला हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन दिवसांपासून आपण नर्स असल्याचं भासवून कामाला लागली होती, तिनंच बाळाचं अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवसाच्या बाळाला महिलेनं आपल्या हातातील बॅगमध्ये टाकून पलायन केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत होते.
सांगलीच्या तासगावमध्ये नर्स असल्याचं भासवून एका महिलेने डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर तिनं विश्वास संपादन करत संधी साधली आणि अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण केलं. बाळ सापडत नसल्यानं शोधाशोध झाली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता.
तासगाव येथील सिध्देश्वर चौकातील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात एका महिलेची प्रसूत झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचं भासवून सबंधितांच्या वार्डमध्ये गेली. तिथून एक दिवसाच्या बाळाला घेऊन तिनं आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकलं. या बाळाला घेऊन महिलेनं क्षणार्धात पलायन केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
