एक्स्प्लोर
चाकूचा धाक दाखवत रांका ज्वेलर्सच्या कामगाराकडून दागिन्यांची लूट
पुणे स्टेशन परिसरात मुंबईतील रांका जेलर्सच्या कामगारावर चाकूने वार करत त्याच्याकडचे दागिने लुटण्यात आले आहेत. चाकूचा धाक दाखवत दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने चार चोरट्यांनी लंपास केले आहेत.

पुणे : पुणे स्टेशन परिसरात मुंबईतील रांका जेलर्सच्या कामगारावर चाकूने वार करत त्याच्याकडचे दागिने लुटण्यात आले आहेत. चाकूचा धाक दाखवत दीड कोटींचे हिरे आणि सोन्याचे दागिने चार चोरट्यांनी लंपास केले आहेत.
मुंबईतील रांका ज्वेलर्सचा कर्मचारी असलेला अजय होगाडे हा तरुण काळबादेबीतील झवेरी बाजारातील रांका ज्वेलर्सच्या दुकानातून दीड कोटींचे दागिने घेऊन पुण्याला गेला होता. पुणे स्टेशनच्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मशेजारील रिक्षा स्टँडवर चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली, तसंच त्याच्याकडचे दागिने आणि हिरेही लूटण्यात आले आहेत.
हा तरुण रांका ज्वेलर्सच्या झवेरी बाजारातील दुकानात ऑफिसबॉय म्हणून काम करतो. दागिन्यांच्या चोरीप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
