
Pune : शिक्षक की हैवान! वर्गातच विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य; शिक्षकावर गुन्हा दाखल
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे.

Pune Crime news : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील (pune Crime news) चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली आहे. शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत.
या सगळ्या प्रकारानंतर 16 वर्षीय मुलीने आणि कुटुंबियांनी विनमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार वाघोली येथील शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चंदननगर परिसरातील शाळेत ऑगस्ट 2019 मध्ये घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकते. शिक्षक हे तिचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते. मुलगी नामांकित शाळेतील वर्गात एकटीच होती. हे पाहून शिक्षकाने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाने मुलीबरोबर अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्याशी जवळीकदेखील साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं. हा सगळा प्रकार मुलीने घरी येऊन सांगितला घरच्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
महिला असुरक्षित...
पुण्यात मागील काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनेत प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. फक्त शाळकरी मुलीच नाही तर महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात शारीरिक छळ केला जात आहे. अशा अनेक घटना रोज घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या मनातदेखील धास्ती निर्माण झाली आहे. पैशाचं किंवा नौकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केले जात आहे. शिवाय त्यांचे अश्लिल व्हिडीओदेखील काढून व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे महिला हा छळ सहन करताना दिसत आहे तर काही महिला या विरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे.
अशा घटनांमुळे वाढली पालकांची चिंता...
पुण्यातील अनेक शाळांमधून अशा घटना समोर येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शिवाय शाळेत गुड टच बॅड टक वर्गाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यातही अनेक मुली अत्याचाराबाबत बोलू लागल्या आहे. शाळेतील शिक्षकच असं कृत्य करत असेल तर विश्वास नेमका कोणावर ठेवावा, हा मोठा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
