एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....

Kurla bus Accident: कुर्ला बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. अनेकांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. पोलीस सध्या संजय मोरे याची कसून चौकशी करत आहेत.

मुंबई: भरधाव बेस्ट बसखाली चिरडून मुंबईतील कुर्ला परिसरात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. कुर्ला येथील एलबीएस मार्गावर सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने बेस्टचालक संजय मोरे याला मारहाण केली होती. मात्र, काही स्थानिकांनी आणि पोलिसांनी संजय मोरे याला जमावाच्या तावडीतून सोडवले होते. संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याच्या चौकशीत एक नवीन माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी 10 दिवसांचे रितसर प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिसांच्या चौकशीत संजय मोरे याने वेगळीच माहिती दिली.

माझ्या प्रशिक्षणाचा कालावधी 3 दिवसांचा होता. त्यापैकी पहिले दोन दिवस मला संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मला फक्त एकच दिवस इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही. मी गेल्या 30 वर्षांपासून बस चालवत आहे. या काळात माझ्याबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. कोणताही अपघात माझ्या हातून झालेला नाही. बस अनियंत्रित कशी झाली, नेमके काय झाले, इलेक्ट्रिक बसमध्ये काही बिघाड होता का, याबाबत संजय मोरे यांना नेमकेपणाने काहीच सांगता आले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी बेस्ट प्रशासन आणि आरटीओकडून इलेक्ट्रिक बसबाबत अहवाल मागवला आहे. प्राथमिक तपासणीत आरटीओ आणि बेस्ट प्रशासनाने इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता नेमकी चूक कोणाची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

संजय मोरे याला 1 डिसेंबरपासून इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती. तो कुर्ला ते अंधेरी या मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवायचा. सोमवारी अपघाताच्या दिवशी संजय मोरे यांनी दुपारी अडीच वाजता ड्युटी सुरु केली. चार वाजता ते इलेक्ट्रिक बस घेऊन पहिल्या फेरीसाठी बाहेर पडले. दोन फेऱ्या व्यवस्थित पार पडल्यानंतर त्यांच्या ड्युटीचे 6 तास पूर्ण झाले होते. त्यामुळे त्यांना साकीनाकापर्यंत फेरी मारण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते कुर्ला आगारातून बस घेऊन बाहेर पडतात एलबीएस रोडवर बस अनियंत्रित होऊन अपघात घडला.

कुटुंबीयांकडून संजय मोरेंची पाठराखण

संजय मोरे हे नेहमी काम संपवून रात्री 11 वाजेपर्यंत घरी येतात. मात्र, अपघाताच्या दिवशी ते नेहमीच्या वेळेला घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन केले. मात्र, त्यावेळी संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात होते. अखेर रात्री उशिरा एका पोलिसाने संजय मोरे यांच्या मुलाला फोन करुन माहिती दिली. मोरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाठराखण केली आहे. मोरे यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्याकडून वाहन चालवण्यात हलगर्जीपणा होऊ शकत नाही. ते 1989 पासून वाहन चालवत आहेत. त्यांच्याकडून चूक होऊ शकत नाही, असा दावा संजय मोरे यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनी केला.

आणखी वाचा

अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
इस्त्रायल अमेरिकेची दमछाक सुरु होताच इराणकडून ताकद दाखवण्यास सुरुवात; आजवर न वापरलेली सेजल मिसाईल इस्त्रायलवर डागली, 2500 किमी टार्गेटची क्षमता, दुबई एअरपोर्टवर पुन्हा ड्रोन हल्ला
India Helped Bangladesh : संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
Iran Israel America Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार, एकत्र मिळून पेट्रोलिंग करु; डोनाल्ड ट्रम्प यांचं तेल ग्राहक देशांना आवाहन
Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre Eliminated: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; सेफ गेम, गॉसिफ महागात? सतत प्रेक्षकांचा विचार करुन खेळणारी 'ही' सदस्य एलिमिनेट
Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
टिंडर डेटिंग ॲपवरुन पुरुषांना जाळ्यात ओढायच्या; मुंबईतील कॅफेमध्ये नेऊन भलतंच करायच्या, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक वास्तव समोर
Aditya Dhar Working On Dhurandhar 3: 'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
'धुरंधर 2' रिलीज होण्यापूर्वीच 'धुरंधर 3'बाबतची सर्वात मोठी अपडेट; मेकर्सनी आखलीय तगडी रणनिती!
Embed widget