एक्स्प्लोर

Anganewadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात

Anganewadi Jatra 2025 : कोकणातली प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 22 फेब्रुवारीला ही जत्रा असल्याचं आंगणे कुटुंबियांनी जाहीर केलं आहे.

सिंधुदुर्ग : कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.

चाकरमान्यांची पावलं गावाकडे वळणार

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.

आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 22 फेब्रुवारीला

आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा येत्या 22 फेब्रुवारीला
होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.

नवसाला पावणारी भराडी देवी

मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.

दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी

दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.

देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो

सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात येते. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा:

Kumbh Mela 2027 : गोदावरीत स्नानासाठी बंदी? आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी; गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

Shani Transit 2026: अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
Diwali Padwa Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Padwa Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Padwa 2026: आज दिवाळी पाडवा! पतीच्या औक्षणासाठी 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, बलिप्रतिपदा तिथी, पूजाविधी, धार्मिक महत्त्व...
आज दिवाळी पाडवा! पतीच्या औक्षणासाठी 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, बलिप्रतिपदा तिथी, पूजाविधी, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Embed widget