एक्स्प्लोर

40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त

SRPF शहरात बोलावण्यात आली आहे, संवेदनशील ठिकाणी त्यांचा वापर करणार असल्याचेही आयजी शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले. 

Parbhani Violance: परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर परभणीत आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हाभरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काल रात्री उशिरापर्यंत दंगलखोर अशा धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे.या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वतः आयजी शहाजी उमप हे परभणीत थांबून आहेत. शहरातील परिस्थती आता काहीशी बदलत आहे.

परभणीत हिंसाचारप्रकरणी 40 जणांवर गुन्हे

परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या 40 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आयजी शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही उमाप यांनी स्पष्ट केले. SRPF शहरात बोलावण्यात आली आहे, संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचेही शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले. 

पंचनाम्यानला आजपासून सुरुवात

परभणी शहरात बुधवारी दुपारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता शांतता पसरली आहे स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आईजी शहाजी उमप परभणी ठाण मांडून असून परभणी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या दंगलखोरांनी शहरात धुडघूस घालून नुकसान केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात शांतता पसरली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन स्वतः उमप यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही परभणीकरांना शांततेचा आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले असून आजपासून मनपा आणि तहसीलदार यांच्या वतीने हे पंचनामे केले जाणार आहेत.

हिंसक प्रकारामागे काही वेगळे प्लॅनिंग होते का?

आंदोलनात 16-17 मोटरसायकलीचे नुकसान झाले आणि 2 फोर व्हीलर गाड्यांचे नुकसान झाले आहे. ज्या लोकांनी हे कृत्य केली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध असून त्यांच्यावर कारवाई करणार, असल्याचे उमाप यांनी म्हटले. काल सर्वांनी एकत्रित बसून ठरले असताना काल शांततेत निवेदन देणं अपेक्षित होतं. तरी देखील काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकार केले. त्यावरून या ठिकाणी काही लोकांचे वेगळे प्लॅनिंग होतं का? या दृष्टीने तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget