Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
माझ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 5 वेळा का आले असते याचा विचार माध्यम आणि माझा विरोधात बातम्या पेरणाऱ्या विरोधकांनी करावा असे भावनिक आवाहन माजी मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
Maharashtra Cabinet Expansion: माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे माजी मंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod)अस्वस्थ झाले आहेत.मी नापास असूच शकत नाही. प्रगती पुस्तकात नापास, पत्ता , संजय राठोड यांना डच्चू अशा विविध बातम्या पाहून मनाला वेदना होतात . मी 1993 पासून शिवसेनेत काम करतो आहे . सर्व कामे वेगाने सुरू आहेत . माझ्या कार्यकाळात मी चांगलं काम केलं आहे .माध्यमात मी प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या मनाला लागत आहेत .मी कायम जनतेसाठी काम करत आलोय .त्यामुळे माध्यमांनी प्रगती पुस्तकात नापास असल्याच्या बातम्या देऊ नयेत असा हात जोडून संजय राठोड म्हणाले .नापास झालो हा शब्द जिव्हारी लागतो . मी जर प्रगती पुस्तकात नापास असतो, तर माझा जिल्ह्यात बंजारा वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी मोदीचे आले असते का ? असा सवाल करत माध्यम आणि माझा विरोधात बातम्या पेरणाऱ्या विरोधकांनी करावा असे भावनिक आवाहन शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
'माझा मंत्रीपदाबाबत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, मात्र मी प्रगती पुस्तकात नापास हे चालवणे योग्य नाही, अशी नाराजीही राठोड यांनी व्यक्त केली. विधानसभेच्या निकालानंतर आगामी मंत्रीमंडळात शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यात अब्दुल सत्तारांसह आमदार संजय राठोड यांचंही नाव होतं. भाजपचे नेतृत्व आमदारांचं प्रगती पुस्तक पाहून निर्णय घेणार असल्याची चर्चा होती.यावर राठोड यांनी नाराजी दाखवलीय.
काय म्हणाले संजय राठोड?
मंत्री म्हणून काम करतानाही मी ४ दिवस जिल्हा व मतदार संघासाठी वेळ दिलेला आहें.कोट्यावधी रुपये मी मतदार संघ जिल्हा यासाठी कामा निमित्त आणले आहेत.बंजारासमाजाची काशी ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्रासाठी कोट्यावधी रुपये शासनाकडून आणून बंजारा समाजाचा इतिहास देशाच्या कानाकपर्यात पोहचवण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यावर 2021 ला एका आरोप झाला . यात चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतः राजीनामा दिला होता . महाविकास आघाडीच्या काळात याची चौकशी झाली आणि मला क्लीन चीट मिळाली . त्यानंतर माझ्यावर कुठलीही चौकशी सुरू नाही .त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मला पुन्हा मंत्री केले . मंत्रीपद मिळाल्यावरही माझ्यावर कोणताही आरोप नाही . कोणताही वादग्रस्त वक्तव्य मी केलं नाही त्यामुळे नापास होण्याचा प्रश्नच येत नाही .
मागील अडीच वर्षात माझावर कोणताही आरोप नाही. मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही किंवा माझं अशा प्रकरणात नाव नाही. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाही.माझा जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ५ वेळा आले हे का आले असते. याचा विचार माध्यम आणि माझा विरोधात बातम्या पेरणार्या विरोधकांनी करावा असे भावनिक आवाहन माजी मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
मंत्रीपदाच्या नावांवर दिल्लीत चर्चा?
राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 12 ते 13 रिपदं मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकरांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते अशीही चर्चा आहे. त्याचवेळी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मात्र मंत्रिपदापासून मुकावं लागणार असल्याची चर्चा आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.