एक्स्प्लोर

Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल

Valmik Karad : अवादा पवनऊर्जा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड : पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांच्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पाची कामं सुरु आहेत. ही कामं बं करण्याची धमकी देत कामं सुरु ठेवायची असल्यास 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुलेवर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे. 

सुदर्शन घुलेला पुढे करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद आवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्साजोग  येथील सुनिल केदू शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात देखील विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत. आता पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरुन केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरपंच खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पुढे करत पवनचक्कीच्या कंपनीला मागितले दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे. 

सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार  29 नोव्हेंबरला ते सकाळी 10  वाजता मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना विष्णू घाटेच्या मोबाइल वरून फोन आला आणि त्यांनी मला वालिमीक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थीती मध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद बंद करणेबाबत धमकी दिली. 

सुनील शिंदेंनी तक्रारीत पुढं म्हटलं की ते आणि शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी त्याच दिवशी अडीचच्या सुमारास सुदर्शन घुले रा. टाकळी हा आमचे मस्ताजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा असे म्हणून केज मध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाची अगादा कंपनीची सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन असे म्हणून धमकी दिली होती. काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक अण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालु ठेवायचे असेल तर 2 करोड रुपये द्या असे सांगितले होते, त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत, असं सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

इतर बातम्या :

Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पोलिसांना महत्त्त्वाचा धागा सापडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Embed widget