Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पुण्यात आईने पोटच्या मुलीचं लग्न स्वतःच्या प्रियकाराशी लावून दिलं
पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच लावून दिल पोटच्या पोरीचं स्वतःच्या प्रियकाराशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime : पुण्यात (Pune) माणुसकीला काळीमा फासणारी घटना (pune Crime) घडली आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या पोरीचं लग्न स्वतःच्या प्रियकाराशी लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिल्याप्रकरणी पोलिसांनी आई आणि प्रियकराविरोधात बलात्कार आणि बाल विवाह प्रतिबंध कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब वडगाव शेरी भागात वास्तव्यास आहे. पीडित मुलीच्या आईचे संबंध एका व्यक्तीशी होते आणि तिने तिच्या मुलीला "हेच तुझे वडील आहेत" असे सांगितलं होतं. दोघे नीट राहत होते आणि मुलगी देखील हे सगळं स्वीकारायची तयारी करत होती. मात्र काही दिवसानंतर आईने मुलीला धमकी दिली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. काही दिवसांनंतर आईनेच मुलीला "तुला या व्यक्तीशी लग्न करावे लागेल नाहीतर मी जीव देईन" अशी धमकी दिली आणि त्यानंतर पीडित मुलीला आरोपीशी लग्न करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपीने अनेक वेळा या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीचं वय 15 वर्ष असून तिने तिच्यासोबत झालेली घटना शाळेतल्या मित्राला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.
मित्राला सांगितल्यावर घटना उघड
आई तिच्या प्रियकराशी माझं लग्न लावून देत आहे. मी नकार दिला तर ती जीव देईन अशी धमकी तिने मला दिली आहे. त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केलं तरी देखील आई काही म्हणाली नाही. असं मुलीने आपल्या मित्राला सांगितलं. त्यानंतर मित्राला ऐकून धक्का बसला. त्याच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीबरोबर असं गैरवर्तन केल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे विश्वास नेमका कोणावर ठेवायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली आहे. आई आणि तिचा प्रियकर अशा दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात कलम 506, 376 यासह बालविवाह प्रतीबंधक अधिनियम 9,10, 11 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून अधिनियम या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाची पुणे पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
