एक्स्प्लोर
Pune crime Swargate: दत्तात्रय गाडेला शोधायला पोलिसांनी उसाच्या फडात सोडले कुत्रे; आकाशात ड्रोनच्या घिरट्या, शिरूरमध्ये सर्च ऑपरेशनची A टू Z स्टोरी
Swargate bus Depo: आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते अशी माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे.
Swargate bus Depo
1/9

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा दत्ता गाडे रहिवासी आहे. याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचं घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते अशी माहिती आहे.
2/9

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.
3/9

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शिरूरमधील ऊसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे.
4/9

आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखे दिसतात. घटना घडल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून आरोपी गाडे याचा फोन बंद आहे.
5/9

गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी 2 गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात असे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचे गाव शिरूर गाठलं होतं.
6/9

शिरूरच्या साळुंखे फार्म हाऊस परिसरात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांसोबतच श्वानपथक देखील आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आलं आहे.
7/9

48 तासापासून पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या गुणाट गाव परिसरात आल्याची माहिती आहे.
8/9

इतकंच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावले असून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जातो आहे.
9/9

आरोपी दत्तात्रय गाडीच्या गावाला छावणीचे स्वरूप आलं आहे. सर्वत्र त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून श्वान पथक-ड्रोनद्वारे शोध सुरु आहे.
Published at : 27 Feb 2025 04:32 PM (IST)
आणखी पाहा























