सोमय्यांच्या सत्कारानंतर पुणे महापालिकेतील 'त्या' पायरीचे कॉंग्रेसकडून शुद्धीकरण
भाजप नेते किरीट सोमय्या (Bjp Kirit Somaiya) यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात त्या ठिकाणी भाजपने सत्कार केला आहे. या पायऱ्यांचे कॉंग्रेसकडून शुद्धीकरण करण्यात आले आहे.

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली त्याच पायरीवर भाजपने आज सत्कार करण्यात आला. हा सत्कार कॉंग्रेसला आवडलेले दिसत नाही. याचे कारण म्हणजे त्यानंतर कॉंग्रेसने त्या पायरीचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सत्कार झाल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी येथे येत स्मृतिस्थळ गोमुत्र शिंपडून, तसेच त्याचे शुद्धीकरण केले. किरीट सोमय्या यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला होता, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन कारेकर यांनी गुलाबपाणी आणि गोमुत्र शिंपडून पायऱ्यांचे शुद्धिकरण केले. पुणे महानगरापिलकेत भाजप सत्तेत आहे. पुण्यातील रस्ता, खड्डयाचे, आरोग्याचे प्रश्न सोडून भाजपला सोमय्यांचा सत्कार करणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आम्ही भाजपच्या संस्कृतीप्रमाणे या पायरीचे शुद्धिकरण केली. पुणेकर कोणत्याही राजकरणात पडणार नाही. ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या पायरीचे शुद्धीकरण केले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या सत्कार करण्यात आलाय. पोलिसांनी या सत्काराला परवानगी नाकारली होती. या सत्काराच्या कार्यक्रमाला कॉंग्रेसने विरोध केला होता. त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. आता कॉंग्रेसच्या या कृतीनंतर पुन्हा राजकीय संघर्ष होणार का याकडे लक्ष लागलंय.
सत्कारानंतर सोमय्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलंय. कोविड सेंटर चालवायला दिलेली कंपनी बोगस असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. याबाबत पालिका आयुक्तांकडे किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय असा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. महाविकास आघाडीनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
