Mumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
महाशिवरात्रीनिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. शिवशंकराच्या मंदिरांमध्ये अभिषेक आणि दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढ्या नागनाथ या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. त्याचसोबत राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी आहे.
Mahashivratri 2025: शिव सत्य आहे.. शिव सुंदर आहे... शिव अनंत आहे.. शिव ब्रम्ह आहे...शिव भक्ती आहे.. हिंदू धर्मात भगवान शंकराला आदिदेव म्हटले जाते. शिव, भोलेनाथ, आदिनाथ, महेश अशी अनेक नावे भगवान शंकराची आहेत. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे अत्यंत भोळे असून आपल्या भक्ताला ते वरदान देतात. अशा या भगवान शिवाचा सण म्हणजेच महाशिवरात्री.. या निमित्त देशभरात तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. या दिवसाची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच, ते भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक करतात.
महाशिवरात्री पूजेची वेळ
ज्योतिषींच्या मते शिवरात्रीच्या निशिता काळात पूजेची वेळ 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:23 ते 1:12 पर्यंत असेल. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:55 ते 8:54 पर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे.
शिवरात्रीला पूजा करण्याची पद्धत
सकाळची तयारी : सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून व्रताचा संकल्प करा.
शिवलिंगाचा अभिषेक : शिवलिंगाला गंगाजल, दूध, दही, तूप, मध आणि साखरेने स्नान घालावे.
पूजा साहित्य अर्पण करणे : भगवान शंकराला बेलपत्र, धतुरा, भांग, मनुका, पांढरी फुले इत्यादी अर्पण करा.
मंत्राचा जप : “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा.
आरती आणि प्रसाद : भगवान शंकराची आरती करा आणि प्रसाद वाटप करा.





















