किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार, पालिकेबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ
Kirit Somaiya : ठाकरे सरकारचा भ्र्ष्टाचाराचा घोटाळा बाहेक काढण्याचा इशारा दिला आहे.
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजपने सोमय्या यांचा सत्कार करणार केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर होणाऱ्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर सोमय्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलंय. कोविड सेंटर चालवायला दिलेली कंपनी बोगस असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. याबाबत पालिका आयुक्तांकडे किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय असा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. महाविकास आघाडीनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे.
सोमय्या म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश मुळीक यांचे मनापासून आभार मानतो. उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझे आव्हान आहे की, तुम्ही ज्या कोव्हिड कंपनीला कंत्राट दिलं. त्या कंपनीचा मालक कोण आहे उद्धव ठाकरेंनी सांगावे. त्या कंपनीचा मालक केईएम रुग्णालयाच्या मागे असणार चहावाला आहे. कोरोनाकाळात महाविकासआघाडी सरकार पुणेकरांच्या जीवाशी लोकांशी खेळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर होणाऱ्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पुणे महापालिका परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं होते. शिवाय मनपा इमारतीत फक्त भाजप नगरसेवकांनाच परवानगी देण्यात येणार आहेया पार्श्वभूमीवर पुणे महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंमत असेल तर सोमय्यांना रोखून दाखवा असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल होते. तर काँग्रेसनं सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केलाय. त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिलाय. त्यामुळे आज पुन्हा राजकीय संघर्ष होणार का याकडे लक्ष लागलंय.
संबंधित बातम्या :