एक्स्प्लोर

Pooja Khedkar : पूजा खेडकरांच्या आईला 'मुळशी पॅटर्न' भोवणार, 'त्या' व्हायरल व्हिडिओची चौकशी होणार

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या खासगी ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केल्याची घटना ताजी असतानाच त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशी (Mulshi) तालुक्यातील शेतकऱ्यांवर दादागिरी केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पूजा खेडकर यांच्या खासगी ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली होती. त्यातच आता मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. 

मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ? 

आता याच व्हिडिओवरून त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोरमा खेडकर यांच्या दमदाटीच्या व्हिडिओची आता तपासणी होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस या व्हिडिओची तपासणी करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का? हे देखील तपासले जाणार आहे.  तो व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याबाबतही तपासणी होणार असून पौड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?

वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर हे सरकारी नोकरीत असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली असून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन त्यांच्या नावे आहे. मात्र ही जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरदेखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. याबाबत शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत तक्रारदेखील नोंदवण्यात आलेली नाही. मात्र आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांना थेट पोलीस प्रोटेक्शन, पुणे पोलिसांच्या नोटिसीवर काय म्हणाल्या?

Pooja Khedkar Car: पुणे पोलिसांची नोटीस धडकताच वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या बंगल्यातून ऑडी कार जागेवरून गायब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget