Pooja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकरांना थेट पोलीस प्रोटेक्शन, पुणे पोलिसांच्या नोटिसीवर काय म्हणाल्या?
Pooja Khedkar : ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी करणे, होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावणे, अशा विविध कारणांनी पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत.
Pooja Khedkar : कोट्यवधींची संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईलने प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) चांगलीच चर्चेत आली आहे. ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी करणे, तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावणे, अशा विविध कारणांनी त्या राज्यभरात चर्चेचा विषय बनल्या आहेत. नुकतीच पूजा खेडकरची वाशिम (Washim) येथे बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांचे दररोज नवनवीन कारनामे उघडकीस येत असून आता पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी पूजा खेडकरची वाशिममध्ये उचलबांगडी करण्यात आली आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याच्या कारणावरून ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून आता 30 जुलै 2025 पर्यंत वाशिममध्ये तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी असणार आहे. त्यातच आता पुणे महापालिकेचा अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
पूजा खेडकरांच्या बंगल्याची पुणे महापालिकेचे पथक पाहणी करणार
पुणे महापालिकेचे पथक पूजा खेडकर यांचा बाणेर रोडवर असलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पाहणी होणार असून अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास महापालिका कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाहणीत महापालिकेच्या हाती काय लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूजा खेडकरांना पोलीस बंदोबस्त
तर, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. वाशीम येथील विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी वादग्रस्त असलेल्या आयएएस प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन सरकारी वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेले आहे. आपल्या प्रशिक्षणासाठी आणि सरकारी कामकाज समजावून घेण्यासाठी त्या रवाना झाल्या आहेत.
काय म्हणाल्या पूजा खेडकर?
पूजा खेडकर यांनी खासगी वाहनावर लाल दिव्याचा वापर केल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत पूजा खेडकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला काही बोलण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे मी काही बोलणार नाही, असे म्हणत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या