Ajit Pawar : सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका; अजित पवारांचा शेतकऱ्यांचा सल्ला
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
Ajit Pawar : सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. बारामतीतील माळेगाव येथे सोमवारी राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावर बोलताना अजित पवार यांनी भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले की, रस्ता रुंदीकरणामध्ये लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावलीत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले. यावर प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.
एसटी कर्मचाऱ्यांना विनंती
एसटी कर्मचाऱ्यांना पाच, सहा आणि सात हजार रुपयांची पगार वाढ दिलीआहे. विलनीकरणाबाबत समिती नेमली आहे. शाळा सुरू झाल्यात सर्व सामान्य लोकांना वंचित राहावं लागतं असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. एसटी कर्मचारीदेखील आपलेच आहेत. मात्र, हे असेच (विलीनीकरण) करा असे सांगता येत नाही. एसटी सुरू करावी अशी विनंतीही अजित पवार यांनी संपकऱ्यांना केली आहे.
सीएनजी ट्रॅक्टरचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सीएनजी किट असलेल्या ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, सीएनजी किटमध्ये 10 किलो गॅसची क्षमता आहे. सीएनजीमुळे 4 ते 4.5 किमी इतका मायलेज देतो. त्यामुळे इंधनाची 40 टक्के बचत होणार आहे असे मला सांगण्यात आले आहे. मात्र, माझ्या ट्रॅक्टरला सीएनजी बसवले नाही. त्यामुळे याबाबत मला माहीत नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पाहा व्हिडिओ: सरकार पण तुमचंच, सरकारला लुटू नका : Ajit Pawar यांचा शेतकऱ्यांना सल्ला