एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: संजय मोरेचं पाऊल 'वाकडं' पडलं अन् घात झाला, क्लच समजून चुकून 'अ‍ॅक्सिलरेटर'वर पाय; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती

Kurla Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे.

Kurla Bus Accident मुंबई: मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं. 

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. या अपघातामुळं बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर बस चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

तपासात धक्कादायक माहिती-

कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरेला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचा. त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे. पोलीस याच दिशेने तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही-

तुमचे पती संजय मोरे काल कामावर जाताना काय घडलं होतं का?, त्यांची मानसिक स्थिती योग्य होती का?, घरातून निघताना भांडण झालं होतं का?, असा सवाल संजय मोरे यांच्या पत्नीला विचारण्यात आला. यावर जसं नेहमीप्रमाणे कामावर निघतात, तसेच ते गेले. सकाळी काहीही झालं नव्हतं. आम्ही दोघंही नेहमीप्रमाणे आमच्या स्टॉलवर गेलो. ते तिकडून 1 वाजता कामावर जायला निघाले. ते नेहमी वेळेवर जातात. माझा नवरा दारु कधीच घेणार नाही, कधीही ते मान वर करुनही बोलले नाही. आज माझ्या लग्नाला 23 वर्षे झाली. पण अजूनपर्यंत कधीही अपघात झाला नव्हता. माझा नवरा संजय मोरे निर्दोष आहे, त्यांची नक्की सुटका होईल. कारण त्यांनी कधीच कोणाचं वाईट बघितलेलं नाही. जी घटना झाली, ते चुकून झाली आहे. त्यात काय करणार...तुमच्या गाड्या व्यवस्थित नाही. बसचा काहीतरी दोष असावा. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नाही, असं संजय मोरे यांच्या पत्नीने सांगितले. 

संबंधित बातमी:

Kurla Best Bus Accident: आम्हाला सरकारचे 5 लाख नको, अपघातात आई गेली; मुलगा म्हणाला, मृतदेह नेण्यासाठीही पैसे मागताय!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaProtest Against Bangladesh Special Report : बांगलादेशात अन्याय, भारत पेटला; प्रकरण काय?INDIA Alliance Leadership issues : 'दादा' नको, 'दीदी' हवी? इंडिया आघाडीचा बॉस बदलणार? Special ReportKurla Best Bus Accident : मृत्यू सात, कुणामुळे घात? ड्रायव्हर की 'बेस्ट'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget