Protest Against Bangladesh Special Report : बांगलादेशात अन्याय, भारत पेटला; प्रकरण काय?
Protest Against Bangladesh Special Report : बांगलादेशात अन्याय, भारत पेटला; प्रकरण काय?
बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, त्यांना भयभीत करत राहिले. त्यांचे व्यवसाय आणि संस्थांवर देखील हल्ले झाले. हिंदूंचे खून झाले. हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. इस्कॉनच्या पुजाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभे राहिलेल्या वकिलांची देखील हत्या झाली. ही स्थिती स्वतःला हिंदूंचे नेते समजून घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवर चर्चा सुरू असेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करत आहे, ढोंग करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केली.