Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Fact Check : विश्वास न्यूजनं व्हायरल क्लीपची पडताळणी केली असता त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज) : सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका सभेतील क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी कथितरित्या मोकळ्या मैदानात हात करत असल्याचं दाखवलं जातं. या क्लीपला व्हायरल करत सांगितलं जातंय की मैदानात जनता नाही मात्र पीएम मोदी हात हलवत अभिवादन करत होते. मात्र या दाव्यातील सत्य समोर आलं आहे.
विश्वास न्यूजनं व्हायरल क्लीपची पडताळणी केली, त्यामध्ये या व्हिडीओत छेडछाड करुन लोकांच्या गर्दीचा भाग हटवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. खऱ्या व्हिडीओत सभेसाठी दाखल झालेली गर्दी पाहायला मिळाली. हा व्हिडीओ पस्चिम बंगालमधील असून त्याला एडिट करुन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपप्रचारासाठी वापरला जात आहे. पडताळणीत व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं स्पष्ट झालं.
नेमकं व्हायरल काय होतंय?
इन्स्टाग्राम हँडल jagdishdhakadpatel नं 5 डिसेंबरला एक व्हिडीओ क्लीप पोस्ट करत म्हटलं की पब्लिक कुठं आहे?
या क्लीपमध्ये पीएम नरेंद्र मोदी हे मोकळ्या मैदानात हात हलवून अभिवादन करत असल्याचं दाखवण्यात येत होतं.
व्हायरल पोस्टला दुसरे यूजर्स देखील हाच दावा करत आहेत. अशा इतर पोस्ट अर्काईव मध्ये पाहू शकता.
पडताळणी
विश्वास न्यूजनं व्हायरल क्लीपच्या बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी याला क्लीपला स्कॅन करण्यात आलं. ते तपासलं असता यामध्ये एका चित्रपटातील गाण्याचा वापर करुन नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं समोर आलं. विश्वास न्यूजनं क्लिपच्या काही फ्रेम्स घेतल्या, गुगल लेन्स टूलच्या द्वारे सर्च केलं. यानंतर भाजपच्या एक्स हँडल आणि इतर यूट्यूब चॅनेलवर ओरिजनल व्हिडीओ मिळाला. भाजपच्या एक्स खात्यावर हा व्हिडीओ 01 एप्रिल 2021 चा असल्याचं पाहायला मिळालं. बंगालच्या जयनगर येथील तो व्हिडीओ आहे.
Scenes from PM @narendramodi's rally in Jaynagar have the unmissable message of Ashol Poriborton in Bengal.#EbarSonarBanglaEbarBJP pic.twitter.com/ArqLqTcIwM
— BJP (@BJP4India) April 1, 2021
पडताळणी दरम्यान भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर 1 एप्रिल 2021 ला लाइव्ह करण्यात आलेला व्हिडीओ पाहायला मिळाला. पीएम नरेंद्र मोदी बंगालच्या जयनगर येथील रॅलीला संबोधित करत असल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओतील नरेंद्र मोदींचा पोशाख सारखाच आहे जसा नरेंद्र मोदींच्या एडिटेड व्हिडीओ क्लीपमध्ये पाहायला मिळाला. यामुळं स्पष्ट झालं की नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षापूर्वीच्या व्हिडीओशी छेडछाड करुन खोट्या बाबी पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विश्वास न्यूजनं यापूर्वी देखील या व्हिडीओ क्लीपची पडताळणी केली होती. त्यावेळी विश्वास न्यूजनं दैनिक जागरण, पश्चिम बंगालचे प्रमुख जेके वाजपेयी यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी ही क्लीप एडिटेड असल्याची माहिती दिली. रॅलीत मोठी गर्दी होती. या लिंकवर क्लिक करा
पडताळणीत शेवटी Jagadishdhakadpatel नावाच्या इन्स्टाग्राम हँडलची चौकशी केली असता असं दिसून आलं की याला दोन हजार पेक्षा अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष : विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल क्लीप खोटी असल्याचं स्पष्ट झालं.खऱ्या व्हिडीओत स्पष्टपणे पाहायला मिळालं की नरेंद्र मोदी मैदानातील दुसऱ्या भागत असलेल्या जनतेला हात हालवून अभिवादन करत आहेत. तीन वर्ष जुन्या व्हिडीओ छेडछाड करण्यात आली आहे.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूज वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]