एक्स्प्लोर

पुणे पोलिसांच्या कारवाईची गाडी टॉप गिअरमध्ये, एक-एक करुन सर्वांनाच उचललं, मुलाच्या वडिलांपासून पब-बारचा मालक सगळेच जेलमध्ये

Pune Police :  देवेंद्र फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून 24 तासात या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.  

पुणे :  पुण्यात (Pune News)  भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या  अल्पवयीन मुलांला  15 तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी (Pune Police)  चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून  करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगले  तापले. आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.  काल  देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis)  कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी 24 तासात या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली  आहे.  

पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आलीये. विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे.  तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे. 

संभाजीनगरमधून विशाल अग्रवालच्या मुसक्या आवळल्या

विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे नॉट रीचेबल झाले होते अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केलीये. 

पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा : वडेट्टीवार

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.  त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची  न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.  

Video :

हे ही वाचा :

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल सापडला, पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
Supreme Court : गुन्हेगारी प्रकरणातील कलंकित नेत्यांवर आजन्म बंदी नको! मोदी सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र
गुन्हेगारी प्रकरणातील कलंकित नेत्यांवर आजन्म बंदी नको! मोदी सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र
Bihar Politics : तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
Swarget Bus Depo Crime: सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women Safety Nashik : नाशकात अनेक मुक्कामी बसेसचे दरवाजे उघडेच 'माझा'चा Reality CheckABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 27 February 2025Pune Swargate Bus Depot : स्वारगेट केसप्रकरणी नराधमाला अजूनही अटक नाही, पोलिसांच्या आठ टीम कार्यरतABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी
Supreme Court : गुन्हेगारी प्रकरणातील कलंकित नेत्यांवर आजन्म बंदी नको! मोदी सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र
गुन्हेगारी प्रकरणातील कलंकित नेत्यांवर आजन्म बंदी नको! मोदी सरकारकडून सुप्रीम कोर्टात शपथपत्र
Bihar Politics : तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
तेव्हा नितीशकुमारांनी डाव साधला अन् आता भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ताकदीचे पंख छाटले! निवडणुकीत कोण कोणाला भारी पडणार?
Swarget Bus Depo Crime: सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर
Pune Crime Swargate bus depot: पुणे पोलिसांनी भोरमधून दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला बोलावलं, नराधमाच्या कृष्णकृत्यांची खडानखडा माहिती बाहेर आली
पुणे पोलिसांनी भोरमधून दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला बोलावलं, नराधमाची खडानखडा माहिती बाहेर आली
मोठी बातमी:  नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली,  रायगडचा पेच कायम
मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
ENG vs AFG Champions Trophy 2025 : इंग्लंड हरल्यानंतर 'तो' व्यक्ती मैदानात शिरला, सेलिब्रेशन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची कॉलर पकडली अन्... Video
इंग्लंड हरल्यानंतर 'तो' व्यक्ती मैदानात शिरला, सेलिब्रेशन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या खेळाडूची कॉलर पकडली अन्... Video
Embed widget