एक्स्प्लोर

Swarget Bus Depo Crime: सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गाडेला ओळखलं

Swarget Bus Depo Crime: स्वारगेट परिसरातील घटनेतील नराधम आरोपीने पिडित मुलीशी बोलण्याआधी त्याने तोंडावरती मास्क लावला असल्याची माहिती आहे.

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे काही पुरावे तपासाच्या दरम्यान समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी शहर परिसरातील ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत त्याठिकाणी मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवत फसवण्याचा अनेकदा प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ‘कार्यकर्ता’ असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारी देखील असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान हा नराधम आरोपी त्या पिडित मुलीशी बोलण्याआधी त्याने तोंडावरती मास्क लावला असल्याची माहिती आहे.

तोंडावर मास्क लावला पण तरी पटवली ओळख

स्वारगेट बस स्थानकातील काही सीसीटीव्हीमध्ये नराधम आरोपीने तोंडावर मास्क लावलेलं दिसून येतं आहे. मास्कमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी या परिसरातील आणखी काही सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्याचबरोबर नराधम आरोपी ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) असे नराधम आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर जात असावा.  त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याचीशक्यता वर्तवली जात आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत होतं. मात्र, यावेळी ती एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. 

नेमकं काय-काय घडलं?

पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली  एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई - ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget