Women Safety Nashik : नाशकात अनेक मुक्कामी बसेसचे दरवाजे उघडेच 'माझा'चा Reality Check
Women Safety Nashik : नाशकात अनेक मुक्कामी बसेसचे दरवाजे उघडेच 'माझा'चा Reality Check
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर पहाटेच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली आणि यानंतर महिला तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आपण आता. बसचा दरवाजा मात्र उघडा आहे. बस खरं तर इथे आल्यानंतर बसचा दरवाजा जोपर्यंत चालक वाहक बस मध्ये नाही तोपर्यंत याचा दरवाजा बंद असला पाहिजे. नाशिक तुळजापूर नगर मार्गे जाणारी ही बस असल्याचं बोर्ड या बसवर आहे आणि संपूर्ण बसमध्ये इथे शुकशुकाट बघायला मिळतो आहे. काही प्रवासी यायला सुरुवात झालेली आहे ज्यांना आपापल्या इच्छित स्थळी जायच आहे त्या ठिकाणी प्रवासी येत आहेत मात्र ही बस महामार्ग बस स्थानकाच्या शेवटच्या कोपऱ्यात म्हणजे दोन प्रवेशद्वार आहेत, एका बाजूने बस येतात आणि दुसऱ्या बाजूचा प्रवेशद्वार ज्यातन फक्त आणि फक्त प्रवासी हे येऊ शकतात अशा स्वरूपाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. ही बस आहे अशाच 10 ते 15 बस या बस स्थानकामध्ये सध्या उभ्या आहेत. त्यातल्या काही बसचा दरवाजा उघडा आहे. अनेक बस दरवाजे हे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून ठेवण्यात आलेले आहेत मात्र अशा स्वरूपाचे बसचे दरवाजे उघे राहतात आणि अशीच घटना स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली होती. पहाटेपासूनच इथे प्रवाशांची वरदळ आहे. जे कर्मचारी आहेत, वाहक चालक आहेत ज्यांना सकाळच्या फेऱ्या मारायच्या आहेत ते देखील आता बस स्थानकामध्ये आलेले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा फारसा मुद्दा आज तरी इथे बघायला मिळत नाही. मात्र अशा ज्या बस जे कर्मचारी नाही, वाहक नाही, चालक नाही, त्या बस चे दरवाजे खुले आहे. असल्यामुळे असे अनुचित प्रकार घडू शकतात याची खबरदारी मात्र एसटी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे.




















