एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: सहा महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारा जरांगे पाटील आता शरद पवारांचा बाप झालाय: प्रकाश आंबेडकर

Parbhani News: परभणीत प्रकाश आंबेडकर यांचे वादग्रस्त विधान. तिरसट व्यक्तीला देशाचा पंतप्रधान कशाला करताय? मराठा आरक्षणासाठी ओबीसी तयार, मात्र स्वतंत्र आरक्षणासाठी

परभणी: इतिहासात फार जणांना संधी मिळत नाही, मोजक्या लोकांना संधी मिळते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील कोण हे कोणालाही माहिती नव्हते. पण हा सामान्यातला सामान्य माणूस आज शरद पवारांचा (Sharad Pawar) बाप झालाय, असे वादग्रस्त विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. ते सोमवारी परभणीत ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना इतिहासात नाव कोरण्याची संधी आहे. किंबहुना नवा इतिहास घडवण्याची संधी आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्तांची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या एल्गार सभेला प्रकाश आंबेडकर, प्रकाश अण्णा शेंडगे, टी पी मुंडे यांच्यासह लक्ष्मण हाके आदी उपस्थित होते. या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे, शरद पवार, भाजप आणि थेट पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे हे आज शरद पवारांचे बाप झाले आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी ओबीसी लढायला तयार आहे. परंतु स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी आमच्या ताटातून नाही. तसेच घरातील प्रमुख माणूस म्हणून आपण तिरसट माणसाला करत नाही. त्यामुळे पंतप्रधानपदी तिरसट व्यक्ती कशामुळे निवडून देताय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला

शिवरायांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना हाताशी धरुन स्वराज्य निर्माण केले. जरांगे पाटील यांना माझा सल्ला आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसीही लढायला तयार आहे. पण ओबीसींची अट तुम्ही मान्य केली पाहिजे. त्यांची अट एवढीच आहे की, आमचं ताट आम्हाला राहू द्या. आपण वेगळं ताट काढू. त्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ. 

नरेंद्र मोदींसारख्या तिरसट व्यक्तीला पंतप्रधान करु नका: प्रकाश आंबेडकर

आपण उद्या चुकूनमाकून भाजपला मतदान करण्याचा विचार कराल. भाजपकडून काय प्रचार होईल? तर राहुल गांधी म्हणजे काय आहे, नरेंद्र मोदी मोठा आहे. पण तुमच्या कुटुंबातील तिरसट माणूस तुम्ही कुटुंबाचा प्रमुख करणार का, हे सांगा. मग देशाचा पंतप्रधान तिरसट कशाला करताय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

आणखी वाचा

'ही धमकी समजायची का? उद्या जरांगे-पाटलांचा जीव गेला तर एकनाथ शिंदेंची जबाबदारी असणार का?'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget