Numerology: जोडीदाराला जीव लावूनही प्रेमात धोका मिळतो, 'या' जन्मतारखेचे लोक विश्वासघात कधीच विसरत नाहीत, अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक इतरांच्या चुका कधीच विसरत नाहीत, त्यांचा खोटेपणावर तीव्र आक्षेप असतो, मात्र प्रेमात अनेकदा धोका मिळतो.

Numerology: माणूस म्हटलं तर चुका या व्हायच्याच... काही लोक जाणूनबुजून किंवा नकळत चुका करतात, तर काही लोक दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी, इतरांना दुखावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही लोकांचा असा स्वभाव असतो की, ते लोकांच्या चुका सहज विसरतात आणि काही झालेच नाही असे दाखवतात. दुसरीकडे, अशा लोकांची देखील काही कमी नाही, जे लहानसहान गोष्टी मनावर घेतात आणि त्यांच्याबद्दल आयुष्यभर दुःखी होतात. काही लोक प्रेमात इतके गुंतून जातात, की त्यांच्यासोबत विश्वासघात होतोय किंवा नाही, हे देखील समजत नाही. परिणामी त्यांना प्रेमात धोका मिळतो..
लोकांच्या चुका माफ करतात, पण त्यांना कधीच विसरत नाहीत...
अंकशास्त्रात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख म्हणजेच मूलांकाच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेले लोक लोकांच्या चुका माफ करतात पण त्यांना कधीच विसरत नाहीत. या लोकांना प्रेमात अनेकदा विश्वासघात पत्करावा लागतो.
कोणत्या लोकांची फसवणूक होऊ नये?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे मन अगदी साफ असते. ते खोटे बोलणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करतात. हे लोक स्वतः खोटे बोलत नाहीत आणि ते सहन करू शकत नाहीत. जर कोणी त्यांची फसवणूक केली, तर ते त्याला क्षमा करतात. पण त्याचा विश्वासघात कधीच विसरत नाही. या लोकांच्या मनात जे काही घडते, ते स्पष्टपणे बोलतात. फसवणूक करणे त्यांना आवडत नाही.
View this post on Instagram
प्रेमात अनेकदा फसवणूक होते..
अंकशास्त्रात असे म्हटले आहे की, जे लोक 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 17, 20, 22, 24, 27, 29 आणि 31 तारखेला जन्मलेले असतात ते मनापासून खरे असतात. हे लोक आपल्या पार्टनरला खूश ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, पण शेवटी त्यांची फसवणूक होते.
हेही वाचा>>
Shani Sade Sati: टेन्शन संपायला अवघे 5 दिवस शिल्लक! 29 मार्चला शनीचं मोठं संक्रमण, 'या' राशींची साडेसाती संपतेय, तर 'या' राशींची सुरू होणार..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

