MI vs CSK IPL 2025: फलंदाजीसाठी येताच मैदानात घेरले; सामना संपताच MS धोनीने दीपक चहरला बॅटने धुतले, VIDEO
MI vs CSK IPL 2025: दीपक चहर आणि एमएस धोनी यांचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MI vs CSK IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत विजय झाला. चेन्नईने मुंबईवर 4 विकेट्सने मात करत विजय मिळवला. सगळ्यांचं लक्ष लागलेला एमएस धोनी (MS Dhoni) देखील फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईकडून खेळणारा मुंबईचा दीपक चहर आणि एमएस धोनी (MS Dhoni And Deepak Chahar) यांचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चेन्नई आणि मुंबईचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यादरम्यान एमएस धोनी विशेषतः दीपक चहरच्या येण्याची वाट पाहतो. दीपक चहर एमएस धोनीसमोर येताच, धोनी त्याला काहीतरी म्हणतो आणि नंतर त्याच्या बॅटने चहलरा मारतो. दरम्यान, दीपक चहर आणि एमएस धोनी यांचे एकमेकांशी खूप चांगले नाते आहे. दोघेही अनेकदा मैदानावर एकमेकांशी मस्ती करताना दिसले आहेत. दरम्यान, एमएस धोनीची फलंदाजी करताना एक झलक पाहण्यासाठी चाहते मैदानात उत्सुकतेने वाट पाहत होते. यावेळी एमएस धोनी फलंदाजीसाठी देखील आला. धोनीने 2 चेंडू खेळले, मात्र त्याला एकही धाव करता आली नाही. दरम्यान, जेव्हा एमएस धोनी फलंदाजीसाठी आला तेव्हा दीपक चहरने त्याच्यासोबत जोरदार स्लेजिंग केले. धोनी फलंदाजीसाठी मैदानावर येताच, चहर त्याच्याकडे गेला आणि स्लेजिंग करत टाळ्या वाजवू लागला. सामना संपल्यानंतर धोनीने चहलरला बॅटने मारत चांगला बदला घेतल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे.
एमएस धोनीने दीपक चहरला बॅटने धूतले, VIDEO:
#Dhoni ~ #DeepakChahar 🤍#IPL2025 #CSKvMI pic.twitter.com/dLzFYwuG1s
— 𝙰𝚊𝚍𝙷𝚒𝚉 (@AadHiZ49) March 24, 2025
दीपक चहर 7 वर्षांपासून चेन्नईकडून खेळला-
32 वर्षीय दीपक चहरने 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, 2018 ते 2024 पर्यंत, दीपक चहर फक्त चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. तथापि, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, चेन्नईने दीपक चहरला सोडले आणि लिलावादरम्यान त्याच्यासाठी आरटीएम कार्ड देखील वापरले नाही. मुंबई इंडियन्सने दीपक चहरला 9.25 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलमध्ये दीपक चहरसाठी मुंबई इंडियन्स ही तिसरी फ्रँचायझी आहे.
मुंबई आणि चेन्नईचा सामना कसा राहिला?
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईला 20 षटकांत 9 बाद 155 धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने 19.1 षटकांत 6 बाद 158 धावा करत बाजी मारली. रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या फिरकीपटू विघ्नेश पुथुर याने प्रभावी कामगिरी केली. त्याने ऋतुराजसह शिवम दुबे आणि दीपक हुडा यांना बाद करत मुंबईच्या आशा उंचावल्या. मात्र, रचिन आणि ऋतुराज यांनी शानदार अर्धशतक झळकावत चेन्नईला विजयी केले.
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

