एक्स्प्लोर

Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?

Economic Survey 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. उद्या अर्थसंकल्प सादर होईल.

Economic Survey 2025, Budget 2025 नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल मांडला जातो. आर्थिक पाहणी अहवाल दरवर्षी तयार करतात आणि तो बजेटच्या मांडणीपूर्वी सादर केला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेने संबंधित आर्थिक वर्षात कशी कामगिरी केली आणि पुढच्या काळात भारताच्या काय योजना असतील, या संदर्भातील माहिती आर्थिक पाहणी अहवालात असते. 

आर्थिक पाहणी अहवालात संबंधित आर्थिक वर्षातील कामगिरीचं सखोल विश्लेषण, भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी, प्रमुख आर्थिक निर्देशांक आणि भावी अंदाज असतात. अर्थसंकल्पाशी निगडित प्रमुख कागदपत्रांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. 

आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं?

आर्थिक पाहणी अहवाल केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाजाची विभागाच्या अर्थविषयक विभागाकडून तयार केला जातो. भारत सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्याकडून याचं निरीक्षण केलं जातं.

आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्यामध्ये आर्थिक स्थितीचं परीक्षण करणे आणि विविध क्षेत्रांच्या प्रगतीचं मूल्यमापन करणे, आर्थिक निर्देशाकांचा विश्लेषण ज्यामध्ये रुपयाची घसरण, ग्राहकांच्या खरेदीचा पॅटर्न, विकास दर यासंदर्भातील माहिती असते. प्रमुख बदल सूचवलेले असतात. गरिबी दूर करणे,  वातावरणीय बदलाचा परिणाम, शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधा, वित्त विभागाचा विकास यासंदर्भातील नावीन्यपूर्ण गोष्टींचा त्यात समावेश असतो.

1950-51 मध्ये पहिल्यांदा आर्थिक पाहणी अहवाल अर्थसंकल्पाचा भाग म्हणून सादर करण्यात आला.1960 पासून तो अर्थसंकल्पापासून वेगळा सादर करण्यात आला. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाो. 

आर्थिक पाहणी अहवालात विविध आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचं सखोल परीक्षण केलेलं असतं. आर्थिक धोरणासंदर्भातील  काही मुद्द्यांचा अभ्यास, याशिवाय अर्थमंत्र्यांकडून काही घोषणांची शक्यता आहे. 

2024-25 चा आर्थिक पाहणी अहवाल कधी सादर होणार 

भारताच्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरु होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीनिमित्त अभिभाषण करतील. त्यानंतर निर्मला सीतारामन दुपारी 12 ते 1 दरम्यान आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडतील. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनाथा नागेश्वरन माध्यमांना अडीच वाजता माहिती देतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प उद्या सादर होईल. यामध्ये सरकार कोणत्या घोषणा करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी दिली; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी दिली; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Satara News : माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
Sangli Crime: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं, सांगली हादरली
आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं, सांगली हादरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?Manoj Jarange Parbhani : सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार? मनोज जरांगेंनी सांगितली तारीखABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 21 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी दिली; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी दिली; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Satara News : माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला!
Sangli Crime: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं, सांगली हादरली
आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं, सांगली हादरली
Ganesh Utsav 2025: पीओपी आणि उंच गणेशमूर्तींना बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड, मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकाने एकच खळबळ
मुंबईत पीओपी आणि उंच गणेशमूर्तींना बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड, मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकाने एकच खळबळ
Bus Blasts Near Tel Aviv : इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये भीषण साखळी बॉम्बस्फोटांची मालिका; देशभरात बस आणि रेल्वे सेवा बंद
इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये भीषण साखळी बॉम्बस्फोटांची मालिका; देशभरात बस आणि रेल्वे सेवा बंद
vohra committee report: दाऊद, अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांच्या कनेक्शनचा वोहरा समितीचा अहवाल गायब; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांच्या युतीचा वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृहखात्याच्या रेकॉर्डवरून गायब?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार?
माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार?
Embed widget