Kunal Kamra Insta Post: झुकेगा नहीं साला! एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक, कुणाल कामराने 'तो' फोटो ट्वीट करत पुन्हा ललकारलं!
Kunal Kamra Triggers Row Sings Song: एकीकडे टीकेची झोड उठलीय, गुन्हा दाखल झाला आहे. आता तर माफी मागण्यासाठी अल्टीमेटमही देण्यात आला आहे. पण, मागे हटेल तो कुमाल कसला? कुणाल कामराबाबत ओढवलेलं हे वादाचं प्रकरण काही पहिलं नाही.

Kunal Kamra Triggers Row Sings Song: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुणाल कामरानं त्याच्या एका मुंबईतील (Mumbai News) शोमध्ये महाराष्ट्रात (Maharshtra Politics) साधारणतः तीन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपावर विडंम्बनात्मक गाणं (Satirical Song) सादर केलं. यावेळी त्यानं थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. तसेच, काही आरोपही केले. कुणालनं हा व्हिडीओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आणि क्षणार्धातच हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर शिवसैनिकांची (Shivsainik माथी भडकली आणि कुणाल कामराविरोधात टीकेची झोड उठली. शिवसैनिकांसोबतच शिवसेनेचे आमदार, खासदार सारेच कुणाल कामरावर तुटून पडले. त्याचा शो मुंबई खारमधील ज्या स्टुडिओमध्ये झाला, तिथे पोहोचून शिवसैनिकांनी थेट तोडफोड करायला सुरुवात केली. याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे टीकेची झोड उठलीय, गुन्हा दाखल झाला आहे. आता तर माफी मागण्यासाठी अल्टीमेटमही देण्यात आला आहे. पण, मागे हटेल तो कुमाल कसला? कुणाल कामराबाबत ओढवलेलं हे वादाचं प्रकरण काही पहिलं नाही. यापूर्वीही स्टँडअप कॉमेडी शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. पण, त्यावेळीही आणि आताही कुणाल पुष्पा स्वॅगमध्येच दिसतोय. एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंम्बनात्मक गाण्यानंतर कुणालवर चोहीकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पण, अशा परिस्थितही कुणाल कामरानं सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे.
वादा उफाळल्यानंतर कुणालनं काय पोस्ट केली?
एकनाथ शिंदेंवरील विडंम्बनात्मक गाणं सादर केल्यानंतर कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर चोहीकडून टीका होत आहे. कुणालचं विडंबनात्मक काव्य झोंबलेल्या शिवसैनिकांनी थेट आरोप करत माफी मागायला अल्टीमेटम दिलं आहे. एवढंच काय तर, ज्या ठिकाणी कुणालचा शो पार पडलेला, त्या खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोडही करण्यात आली. आता उत्तरादाखल कुणालनं एक पोस्ट केली आहे. कुणालनं संविधानाची एक प्रत हातात असलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच, "The only way forward…" असं कॅप्शनही सोबत लिहिलं आहे.
View this post on Instagram
कुणाल कामरानं गायलेलं विडंम्बनात्मक गाणं काय?
"ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए...
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये..."
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























