Budget 2025 : रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Budget 2025 Stocks : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प उद्या (1 फेब्रुवारी)ला सादर करणार आहेत. त्यापूर्वी तज्ज्ञांनी रेल्वेच्या स्टॉक्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडतील. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण, वंदे भारत एक्स्प्रेसच्या संख्येत वाढ करणे, अमृत भारत एक्स्प्रेस, रेल्वे स्टेशनचा विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या कामकाजात एआयचा देखील प्रभावी वापर करण्यासंदर्भात घोषणा शक्य आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी रेल्वेचे तीन स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आरवीएनएल, इरकॉन आणि टीटागड रेल सिस्टीम या तीन स्टॉक्समध्ये (Railway Stocks) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
शेअर मार्केट जाणकारांच्या मते, भारत सरकार देशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासह हाय स्पीड रेल्वे योजना, रेल्वेचं आधुनिकीकरण यांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. पर्यटनाशी संबंधित मार्गांवरील हाय स्पीड रेल्वे योजना, रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण, आधुनिकीकरणासंदर्भात मोठ्या घोषणा हण्याची शक्यता असल्यानं एसकेआय कॅपिटल सर्व्हिसेसचे सीईओ नरिंदर वाधवा यांनी आरवीएनएल, इरकॉन इंटरनॅशनल आणि टीटागड वॅगन्स सारख्या स्टॉक्सला त्याचा फायदा होई शकतो, असं म्हटलं.
रेल विकास निगम लिमिटेड चा शेअर सध्या 438.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. आरवीएनएलनं शेअरधारकांना गेल्या पाच वर्षात 1600 टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या वर्षात जवळपास 48 टक्के परतावा मिळाला आहे.
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर आज 205 रुपयांवर ट्रेड करत आहे. इरकॉननं गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षात 360 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान गेल्या वर्षभरात हा शेअर 13.08 टक्क्यांनी घसरला आहे.
टीटागड रेल्वे सिस्टीम्स हा शेअर सध्या 968 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कंपनीनं गेल्या पाच वर्षात शेअर धारकांना 100 टक्के परतावा दिला आहे. मात्र गेल्या वर्षभरात हा शेअर 11.67 टक्क्यांनी घसरला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या:
अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
