Sharad Pawar : पारनेरचा प्रतिनिधी लोकसभेत गेला अन् इंग्रजीत कसं काय बोलला? शरद पवारांनी पडद्यामागचा इतिहास जसाच्या तसा सांगितला!
Sharad Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखेंना प्रत्युत्तर दिले होते. आता शरद पवार यांनी निलेश लंकेंच्या इंग्रजीत घेतलेल्या शपथेचा पडद्यामागचा इतिहास सांगितला.
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची (Ahmednagar Lok Sabha Constituency) जोरदार चर्चा झाली. शरद पवार गटाच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला होता. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरुन (English Language) टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या इंग्रजीत घेतलेल्या शपथेचा पडद्यामागचा इतिहासच सांगितला आहे.
लंकेंच्या इंग्रजी शपथेचा शरद पवारांनी इतिहास सांगितला
शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे की, पारनेरचा विधानसभेचा प्रतिनिधी लोकसभेत गेला आणि इंग्रजीत कसं काय बोलला. याची माहिती घेतली असता माझ्या लक्षात आलं की, माझ्या दिल्लीच्या घरी इंग्रजीत शपथ घेण्याचा सराव सुरू होता आणि त्यांनी इंग्रजीत शपथ घेतली. मी निलेश लंकेंना सांगितलं की, संसदेत मराठीत बोलता येते. मग काय त्यांनी जोरदार मराठीत भाषणं ठोकलं, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
शरद पवारांचा विखे पाटलांना टोला
नगर जिल्हा बँकेवर आता कोण येऊन बसलं आहे आणि कसं काम करत आहेत. कधी बँकेचा प्रश्न असेल तर माझ्याकडे या आपण बसून मार्ग काढू. आनंदराव अडसूळ कामगार क्षेत्रात काम करणारा नेता आहे. आनंदराव अडसूळ यांनी कायम लक्षात ठेवलं की कामगारांसाठी संघर्ष केला. परंतु त्यांना किती विषय तनायाचा आणि कुठं थांबायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांचा आयुष्यातील अनेक वर्षांचा कालावधी शिवसेनेत गेला मात्र तरीदेखील त्यांनी शांततेत काम सुरू ठेवलं आहे. नगर जिल्हा बँकेचे व्यवस्थापन आता कोण पाहत आहे माहित नाही, कोण तर वेगळे लोक आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना टोला लगावला. तर, नगर जिल्हा बँकेमुळे तेथील सहकाराला चालना मिळाली. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथील सहकारी साखर कारखाना चांगला चालू आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
निलेश लंकेंच्या खासदारकीला कोर्टात आव्हान; उच्च न्यायालयात सुनावणी, नोटीस बजावण्याचे आदेश