एक्स्प्लोर

निलेश लंकेंच्या खासदारकीला कोर्टात आव्हान; उच्च न्यायालयात सुनावणी, नोटीस बजावण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. कारण, राजकीय वारसा असलेले आणि सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या विखे पाटलांविरुद्ध त्यांनी शड्डू ठोकला होता.

अहमदनगर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीला अहमदनगर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके (Nilesh lanke) यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Highcourt) दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली प्रतिवादी निलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लोकसभा निवणुकीत (Loksabha) निलेश लंके हे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आलेला जिल्हाधिकारी यांचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे, खासदार लंके यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना, मतदारसंघातील विजयानंतर आता कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. कारण, राजकीय वारसा असलेले आणि सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या विखे पाटलांविरुद्ध कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका आमदाराने शड्डू ठोकला होता. या निवडणुकीत सुजय विखेंचा जवळपास 28 हजार मतांनी पराभव झाला असून निलेश लंकेंनी पहिल्याच खासदारीकीच्या निवडणुकीत विजयी माळ गळ्यात टाकली. त्यामुळे, विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेलाही आव्हान देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आता, याच पराभवानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.  

सुजय विखे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आला आहे. येथील लोकसभा मतदारसंघातील संबंधित 40 ते 45 केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी याचिकेतून केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, निलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच निलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे, आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निलेश लंकेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे. 

कायदेशीर लढाईचं आव्हान

आमदार असलेल्या निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे देऊन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे, महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांच्या मदतीने त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत दिल्ली गाठली आहे. मात्र, आता कायदेशीर लढाई जिंकून त्यांना आपली खासदारकी शाबूत ठेवावी लागणार आहे. 

हेही वाचा

बाप रे... पुणे जिल्ह्यातून एवढे अर्ज; 'लाडकी बहीण योजने'साठी पुणेकरांची गर्दी, हवेली तालुका सर्वात पुढे

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : सत्तांतर होताच भाजप कार्यकर्त्यांनी TMC कार्यालयावर बुलडोझर चालवला, कोलकात्यातील संघर्ष पेटला
सत्तांतर होताच भाजप कार्यकर्त्यांनी TMC कार्यालयावर बुलडोझर चालवला, कोलकात्यातील संघर्ष पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
Anupam Kher: भावा, मी तुझं काय बिघडवलंय? 'अनुपम खेरच्या टक्कलवर केस उगवतील म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांना अभिनेत्याचा सवाल
भावा, मी तुझं काय बिघडवलंय? 'अनुपम खेरच्या टक्कलवर केस उगवतील म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांना अभिनेत्याचा सवाल
Atul Save OSD Crime News: 'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती
'मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही'; अतुल सावेंच्या स्वीय सहायकाची पत्नीला मारहाण अन् धमकी, पीडितेन सांगितली आपबिती

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget