मोदींची प्रतिमा स्वच्छ, अनेक महापुरुष झाले, पण मोदी महान आहेत, त्यांना अर्थव्यवस्थेची जाण, नारायण राणे कौतुक करताना थांबेनात
Narayan Rane on Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले, पण मोदी महान आहेत.
Narayan Rane on Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले, पण मोदी महान आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेची जाण असलेला माणूस आपला पंतप्रधान आहे. जगभरात मोदींचे कौतुक होतय", असं म्हणत नारायण राणे (Narayan Rane) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. ते चिपळून येथील सभेत बोलत होते.
ज्यांच्याकडे काहीच नाही असे लोक मोदींवर टीका करत आहेत
नारायण राणे म्हणाले, खासदार झालो तर अभिमान वाटेल असं काम करेन. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले,पण मोदी महान आहेत. अर्थव्यवस्थेची जाण असलेला माणूस आपला पंतप्रधान आहे. जगात मोदींचे कौतुक होतय. ज्यांच्याकडे काहीच नाही असे लोक मोदींवर टीका करत आहेत, असं म्हणत नारायण राणे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
निवडणूक झाली की दोन महिन्यात सगळे प्रश्न सोडवून दाखवेन
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, नुसतं दाढी वाढवून यात्रा करत मोदींवर टीका करत आहेत. कोकणात विद्यापीठे नाहीत, मोठे उद्योगधंदे नाहीत. निवडणूक झाली की दोन महिन्यात सगळे प्रश्न सोडवून दाखवेन. दोन दिवसांत पुन्हा येतो. तुम्ही मला बोलवत तरीही आणि नाही बोलवत तरी प्रचारासाठी तरी नक्की येईल. लोकांना फक्त हे देऊ ते देऊ सांगणारे राहुल गांधी लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आहेत का? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय.
महायुतीतील पुढाऱ्यांनी अपशकून करु नये
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाची आहे, या जागेवरुन आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल. या कोकणाचा विकास झाला नाही. ज्यांनी अडीच वर्ष राज्य केलं. त्यांनी काहीही केलं नाही. आता परिवर्तन होणार आहे. भाजपचा खासदार येणे आवश्यक आहे. आमचा कमळाचा आणि बीजेपीचा प्रचार सुरु आहे. सगळ काही झालेलं आहे आणि ठरलेलं आहे. आम्ही अवघडच सोप करु. एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. महायुतीतील पुढाऱ्यांनी अपशकून करु नये. मोदींनी हॅटट्रीक करतील. 400 खासदार होतील. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा खासदार असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या