एक्स्प्लोर

Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी

Amol Kolhe on Congress and Shiv Sena UBT : खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जोरदार टोला लगावलाय.

Amol Kolhe on Congress and Shiv Sena UBT : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतीचा (Mahayuti) दारूण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) भरघोस  होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर महाविकास आघाडातील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला. यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मविआतील मित्रपक्षांना टोला लगावलाय. 

खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जोरदार टोला लगावलाय. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे, असे त्यांनी म्हटले आहे. आता अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे   महत्त्वाचे ठरणार आहे. 

महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

दरम्यान, लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडी विधानसभेत एकत्रित सामोरे गेली. मात्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता महाविकास आघाडी दुरावा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीमध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षातील नेते आपण एकला चलो रेची भूमिका घ्यावी, अशी विनंती करत असल्याची माहिती मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपल्याला फटका बसलेला आहे, अशी ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची भावना असल्याचेही समजते. तर दुसरीकडे काँग्रेसच्याही बैठका सुरु आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. तर तिसरीकडे अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्र मैदानात उतरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
Honey Rose : हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
IPO Update : क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली,GMP कितीवर?
क्वाड्रंट फ्यूचर टेकच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, तब्बल 185 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, नगरसेवकांचा नाराजीचा सूर, म्हणाले...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं, पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
Honey Rose : हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
हनी रोझची एका झटक्यात 30 जणांविरोधात तक्रार, पोलिसांनी थेट उद्योगपतीला वायनाडमधून उचलत बेड्या ठोकल्या! प्रकरण नेमकं काय?
IPO Update : क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली,GMP कितीवर?
क्वाड्रंट फ्यूचर टेकच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, तब्बल 185 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा, नगरसेवकांचा नाराजीचा सूर, म्हणाले...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं, पक्षातील नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Embed widget