एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 2019 वर्ष आलंच नसतं तर...; CM फडणवीसांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, म्हणाले, 'महाराष्ट्राला कुणी...'

Devendra Fadnavis : 2019 साली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते.

Devendra Fadnavis : 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) महायुती म्हणून लढली होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मोठं भाष्य केलं आहे. 2019 हे वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

2019 साली भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला 161 जागा मिळाल्या. त्यात भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन आग्रह सुरु केला. यानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र, अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे गेल्याने हे सरकार केवळ 72 तास चालले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांना 105 आमदारांसह विरोधक म्हणून बसण्याची वेळ आली होती. आता यावरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

...तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मागील दहा वर्षात 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. 2019 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण त्यामुळे विकासाच्या गतीला खिळ बसली होती. 2022 नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता दाव्याने हे सांगतो की, महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

मला आव्हानांची चिंता वाटत नाही 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून मी अनेक आव्हानांचा सामना केलाय. त्यातून आता परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही. आपण मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना, आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचे असा माझा प्रयत्न असणार आहे. मागील दहा वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसं झालं आहे. मला आलेले अनुभव तसेच आहेत. दहा वर्षांपूर्वी लोक संशयाने बघायचे की हा व्यक्ती कधी मंत्रिपदावरही आला नाही आणि  मुख्यमंत्री झाला तर हा काही करु शकेल का? पाच वर्षांच्या पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लोकांनी मी काय करु शकतो किंवा माझी क्षमता काय ते बघितलं, अनुभवलं, असेही त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Amol Kolhe : काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका, शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले
वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका, शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले
Nashik TCS Case: नाशिक TCS प्रकरणात MIM नंतर मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ची एन्ट्री, न्यायालयात वकील दिला; आसिफ शेख म्हणाले, 'ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी...'
नाशिक TCS प्रकरणात MIM नंतर मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ची एन्ट्री, न्यायालयात वकील दिला; आसिफ शेख म्हणाले, 'ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी...'
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक आरोप, राष्ट्रवादीवरही बोलले
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंही काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार; रवी राणांचा खळबळजनक आरोप, राष्ट्रवादीवरही बोलले

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये युगांत! केन विल्यम्ससनचा भर इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटला अलविदा; त्याच्या कर्णधारपदात दोनवेळा वर्ल्डकप फायनल गाठली, भारताला हरवत कसोटी अजिंक्यपदही पटकावलं
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये युगांत! केन विल्यम्ससनचा भर इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटला अलविदा; त्याच्या कर्णधारपदात दोनवेळा वर्ल्डकप फायनल गाठली, भारताला हरवत कसोटी अजिंक्यपदही पटकावलं
Pune News : पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड
पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ का झाली? प्रमुख कारणं
आठवड्याचा शेवट गोड झाला, सेन्सेक्स आणि निफ्टीत तुफान तेजी, शेअर बाजारातील वाढीची प्रमुख कारणं कोणती?
भारताचे महान नेमबाज नेमबाज जसपाल राणा यांचे निधन, कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये 23 पदके जिंकली; गुरुंच्या निधनाची बातमी समजताच दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या मनू भाकरच्या हातातून पिस्तूल निसटली, जमिनीवर बसली

धक्कादायक! पुण्यात आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन;चिठ्ठीत कंपनीतील दोन महिलांचे नाव, हिंजवडी हादरली
धक्कादायक! पुण्यात आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन;चिठ्ठीत कंपनीतील दोन महिलांचे नाव, हिंजवडी हादरली
Pune Accident News: अंगावर काटा आणणारा अपघात! टाटा सफारीने दुचाकीला चिरडले; पुण्यातील थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
अंगावर काटा आणणारा अपघात! टाटा सफारीने दुचाकीला चिरडले; पुण्यातील थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
रोहित पवाराचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी, कोणी पुतना मावशीचे प्रेम दाखवण्याची गरज नाही, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
राज्यसभा नामांकन रद्द करण्याविरोधातील मीनाक्षी नटराजनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाचा उमेदवारी रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य यावर न्यायालयाचे भाष्य नाही
Embed widget