एक्स्प्लोर

Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी

दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मीक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आलं आहे.

Walmik Karad : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडचा कारनामा दिवसागणिक समोर येतच आहे.  वाल्मीक कराडच्या कारनाम्याची भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून दररोज चिरफाड सुरु असतानाच आता आणखी एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आला आहे. 

तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन

दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मीक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आलं आहे. ही धमकी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे.  दोन कोटीच्या खंडणीसाठी वाल्मीक कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावेळी विष्णूने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले होते. यावेळी बोलताना वाल्मीक कराडने सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता. 

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पुण्यात 100 कोटींची संपत्ती

दुसरीकडे, छोट्या आकाला 2022 मध्येच ईडीची नोटीस आली होती. वाॅचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डर पुण्यात असून एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला सात शॉप आका काढत आहे. त्या एका शॉपची किंमत पाच कोटी आहे. विष्णू चाटेची बहीण, आकाची दुसरी पत्नी आणि वाल्मिक आकाच्या नावावर शॉप आहे. हे 40 कोटींचे शॉप आहे. त्या बिल्डरची भेट घेऊन आलो, विचारलं आमच्या आकाला काय काय दिले? आकाने 35 कोटींचे टेरिस मागितले होते. मगरपट्टा येथे एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि हा फ्लॅट कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे, ज्याची किंमत 75 कोटी आहे. ड्राव्हरकडून आकाने राहण्यासाठी करार देखील करून ठेवले, असा सनसनाटी दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची पुण्यात 100 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
PM Kisan : मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
Embed widget