Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP Majha
आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात, घरोघरी जात भाजप सदस्यांची नोंदणी करणार, भाजपचं राज्यात दीड कोटी सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपुरात, राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार, सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याकडे लक्ष.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातही जाणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यातील सुकळी गावात येणार.
चंद्रशेखर बावनकुळे आज विभागीय आयुक्तालयात आढावा घेणार, याशिवाय शेती विकास महामंडळाचे सादरीकरण बघणार.
मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल इतकी भाजपची मुंबईत ताकद, भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू, पण कोणती हे सांगू शकत नाही, भाजप खासदार नारायण राणेंचं वक्तव्य.