एक्स्प्लोर

मोहिते पाटलांविरोधात फडणवीस ईरेला पेटले, उत्तम जानकरांना आमदारकीचे आश्वासन, माढ्यात जोरदार फिल्डिंग

Madha Loksabha : धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईरेला पेटले आहेत.

Madha Loksabha : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ईरेला पेटले आहेत. मोहिते पाटील यांचे विरोधक आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना गळाला लावण्यासाठी फडणवीस यांनी मोठी ऑफर दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून उत्तम जानकर यांना आमदारकीचे आश्वासन देण्यात आले आहे. आता रान मोकळे आहे. तुम्ही मागाल ते देऊ. तुम्हाला आमदारकी देऊ पण मंत्रिपद नाही, अशी ऑफरही देवेंद्र फडणीस यांनी दिल्याचे उत्तम जानकर यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान आत्तापर्यंत उत्तम जानकर यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे उत्तम जानकर म्हणाले आहेत. 

देवेंद्र फडणवीसांचे उत्तम जानकरांसाठी खास विमान 

उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी माढामध्ये मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी खास विमान उपलब्ध करुन दिले होते. त्यानंतर उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये नागपूर येथे बैठक पार पडली होती. त्यानंतर नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी जानकर म्हणाले होते की, कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊन निर्णय घेणार आहे. त्यानंतर जानकर यांची  वेळापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापूही उपस्थित होते. मात्र, याबैठकीनंतर 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबतचा निर्णय स्पष्ट करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. 

उत्तम जानकर यांचं महत्व कशामुळे वाढलं?

धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर मोहिते पाटलांचे विरोधक होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मोहिते पाटलांपासून दूर सुरु ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. काही दिवसांपूर्वी जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर आणि मिळून माळशीरसमधून 1 लाख 30 हजारांचा लीड घेऊ असं म्हटलं होतं. त्यावरुन उत्तम जानकर हे मोहिते पाटलांसाठीही किती महत्वाचे आहेत, हे लक्षात येईल. 

उत्तम जानकरांनी 2019 मध्ये राम सातपुतेंविरोधात लढले होते 

उत्तम जानकर यांनी भाजपचे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात विधानसभा निवडणुक लढली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते आणि उत्तम जानकर आमने सामने आले होते. यावेळी मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. तरिही राम सातपुते केवळ 2 हजार मतांनी निवडून आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांची उत्तम जानकरांशी डील फायनल? वेळापूरमध्ये बैठक, शहाजीबापूंची उपस्थिती, मोहिते पाटलांविरोधात शड्डू ठोकणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget