एक्स्प्लोर

RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला

IPL 2025 : आयपीएलमधील आठवा सामना उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे.

चेन्नई : आयपीएलच्या 18 व्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात उद्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई आणि बंगळुरु हे दोन्ही संघ बलाढ्य असल्यानं कोण विजय होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्याच लढतीत गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. तर, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जनं देखील मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आहे. चेन्नईला चेपॉकवर पराभूत करणं आरसीबीसाठी तितकं सोपं असणार नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसन यानं आरसीबीला उद्याच्या मॅच संदर्भात सल्ला दिला आहे.

शेन वॉटसन हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग राहिला आहे. वॉटसन विराट कोहली आणि एमएस धोनीसोबत खेळला आहे. चेपॉकवर खेळणं कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असतं, असं वॉटसन म्हणाला. 

शेन वॉटसन यानं जिओस्टारवर बोलताना म्हटलं की ज्या प्रकारे चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज आहेत त्यानुसार आरसीबीसमोर कठोर आव्हान असेल. चेन्न्ई विरुद्ध विजय मिळवायचा असेल तर आरसीबीला त्यांच्या संघाच्या रचनेत बदल करावा लागेल. यामध्ये चूक होऊ नये. चेपॉक हा बालेकिल्ला आहे, असं वॉटसन म्हणाला. 

वॉटसनच्या मतानुसार चेन्नईचा चेपॉकवर दबदबा राहिला आहे, त्याचं मुख्य कारण त्यांच्याकडे असणारे फिरकीपटू हे आहे. होम ग्राऊंडवर चांगली कामगिरी करावी अशा पद्धतीनं चेन्नईच्या टीमची रचना करण्यात आली आहे.रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि नूर अहमद यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ते चेन्नईसाठी या फायदेशीर ठरेल. नूरनं ज्य प्रकारे पहिल्या मॅचमध्ये कामगिरी केली आहे त्यामुळं चेन्नईचं मनोबल वाढलं आहे. चेन्नईला माहिती आहे आता त्यांच्याकडे विकेट काढण्यासाठी एक पर्याय आहे, असं शेन वॉटसन म्हणाला. 

मुंबई इंडियन्स विरुद्ध नूर अहमदनं 4 ओव्हरमध्ये 4 विकेट घेत 18 धावा दिल्या होत्या. त्या मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईला 4 विकेटनं पराभूत केलं होतं. दुसरीकडे आरसीबीनं देखील गतविजेत्या केकेआरला 7 विकेटनं पराभूत केलं होतं.  आता दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने येणार आहेत. या मॅचमध्ये कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलचं पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलं नाही. विराट कोहली आणि एमएस धोनीच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget