Lata Mangeshkar Award 2024 : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, 24 एप्रिलला पार पडणार सोहळा
Lata Mangeshkar Award 2024 : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
Lata Mangeshkar Award 2024 : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यग्रह येथे हा सोहळा पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन (दि.24) एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच 2022 वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार 24 एप्रिल 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व 24 एप्रिल 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. यंदाचा हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई येथे बुधवार 24 रोजी सायंकाळी 6.30 वितरित होणार आहे.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन ,
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा साठी ए आर रेहमान ,
मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मिती साठी पुरस्कार गालिब या नाटकाला
आनंदमयी पुरस्कार जो आशा भोसले पुरस्कृत आहे तो समजसेवेसाठीचा पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल ला
वाग्विलासीनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार मंजिरी फडके यांना
मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अशोक सराफ
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार पद्मिनी कोल्हापूरे
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार रुपकुमार राठोड
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार भाऊ तोरसेकर
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अतुल परचुरे
मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा यांना जाहीर करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या