ABP C Voter Opinion Poll : कोण होणार तुमचा खासदार, प्रत्येक मतदारसंघनिहाय 'माझा'चा सर्वात मोठा ओपिनियन पोल
ABP-CVoter Opinion Poll : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे.
LIVE
Background
ABP-CVoter Opinion Poll : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
रावसाहेब दानवेंच्या विजयाची शक्यता
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रावसाहेब दानवेंचा विजय होऊ शकतो, असा कल दर्शवण्यात येत आहे.
ABP C Voter Opinion Poll : मराठवाड्यात भाजपची आघाडी
ABP C Voter Opinion Poll : एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या सर्वेनुसार मराठवाड्यातील जागांवर भाजपला इंडिया आघाडीच्या तुलनेत जास्त जागा मिळू शकतात.
ABP C Voter Opinion Poll : काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का, केवळ 1 जागा येण्याची शक्यता
ABP C Voter Opinion Poll : काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसू शकतो, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. विदर्भात केवळ 1 जागा काँग्रेसची येऊ शकते, असा अंदाज आहे.
ABP C Voter Opinion Poll : विदर्भातील जागांवर भाजपची आघाडी
ABP C Voter Opinion Poll : विदर्भातील 10 जागांवर भाजपची सरशी दिसत आहे. विदर्भातील 6 जागांवर भाजपच्या विजयाची शक्यता आहे. तर एक शिंदे गट, 1 जागा आणि 2 जागांवर ठाकरे गट विजयी होऊ शकतो.
ABP C Voter Opinion Poll : गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान यांच्या विजयांची शक्यता
ABP C Voter Opinion Poll : गडचिरोली लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे.