Nashik News : 'क्वॉलिटी सिटी' म्हणून देशातील पाच शहरांत नाशिक, काय आहे हा उपक्रम?
Nashik News : देशातील पाच शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली असून 'क्वॉलिटी सिटी' म्हणून विकास केला जाणार आहे.
Nashik News : कुशल भारत मोहिमेअंतर्गत कौन्सिल ऑफ इंडिया व नॅशनल कौशल्य विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील संस्थांशी सामंजस्य करार केला जाणार असून, त्यातून 'क्वॉलिटी सिटी' (Quality City) म्हणून नाशिकचा विकास केला जाणार आहे. यासाठी देशातील पाच शहरांमध्ये नाशिकची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान या उपक्रमासाठी क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया व नाशिक (Nashik) महापालिका, जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो (Nashik Credai Metro), नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी व संचालक जितूभाई ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत नाशिक प्रथम क्रमांकावर येण्याचा मानस आहे. यासाठी क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया मदत करण्यात तयार आहे. शहराला लागून असलेल्या पाच गावे आदर्श गावांत जात सावरगाव आणि गंगावाडी सहित नवीन तीन गावे जोडले जातील. त्यासाठी हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांचा शाळा डिजिटल करण्याबरोबरच गळती थांबवण्यावर भर दिला जाणार आहे.
कोणत्या गोष्टींचं विश्लेषण होणार?
घरेलू कामगार, वाहन चालक शिपाई आणि पर्यवेक्षक स्तरावरील व्हाईट स्कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेतात घेण्यात येणार आहे. क्वॉलिटी सिटी नाशिक चळवळ यांत्रिक त्या त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राची परिस्थितीजन्य केले जाईल. त्यानंतर अडथळे आणि संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणारे प्रारुप आखले जाईल. कामगार जोडणीपासून घरकामगार रिक्षा चालक वाहन चालक शिपायांनी डिलिव्हरी बॉयपर्यंत गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. इतकेच नव्हे तर विचार असोसिएशन आणि निकम मानवी संसाधन प्रशिक्षणावर मध्यम स्तरीय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे समजते.
पहिला टप्पा यांच्यासाठी...
दरम्यान उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक शहरातील घरेलू कामगार, वाहनचालक, शिपाई आणि सुपरवायजर स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. विकासाला गती देण्यासाठी तेथील बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून, पुढे तिचे देशातील अन्य शहरांमध्येही अनुकरण केले जाणार आहे. या उपक्रमासाठी देशातील पाच शहरांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी पहिला सन्मान नाशिकला मिळाला आहे, असे खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितले. नाशिक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांचा विकास घडवणे हे या चळवळीचे उदिष्ट असून, त्यासाठी मनपा, जिल्हा परिषद, आदिवासी विकाससह विविध शासकीय विभाग व अन्य संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.